डॉ. मोहन बमनोटे यांची आयुष भारत डॉक्टर असोसीयशनच्या विदर्भ अध्यक्ष पदी निवड

प्रतिनिधी, आयुष भारत डॉक्टर असोसिएशनच्या विदर्भ विभागाच्या अध्यक्ष पदी डॉ.मोहन बमनोटे यांची निवड करण्यात आल्याची माहिती आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आमीर मुलाणी व डॉ.एस.एन.सुतार राष्ट्रीय अध्यक्ष आयुष भारत अल्टरनेटिव्ह मेडिसिन, राष्ट्रीय सचिव डॉ.अनंद भोसले, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.विश्वास वाघमारे, डॉ.विनोद देशमुख महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आयुष भारत संपूर्ण देशात कार्यान्वित असणारी ग्रामीण तसेच शहरातील डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी लढणारे देशातील सर्वात मोठी आयुष भारत डॉक्टर असोसिएशन / संघटना आहे. आयुष भारत संघटनेची कार्य आणि उद्दिष्ट असे आहे आयुष भारत फिरते हॉस्पिटल तसेच औषधांवर संशोधन, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय शिक्षण पुरवणे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण संस्थांची उभारणी करणे, गरीब लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे, 24 तास मोफत ॲम्बुलन्स सेवा पुरवणे, डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायावरती त्वरित मदत करणे, डॉक्टरांना वैद्यकीय कायद्याविषयी मोफत सल्ला देणे. तसेच डॉक्टरांच्या समस्या डॉक्टरांचे विविध प्रश्न यासाठी कार्य करणारी देशातली सर्वांत मोठी आयुष भारत संघटना ओळखली जात आहे. अशी माहिती आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे विदर्भ विभागाच्या अध्यक्ष डॉ.मोहन बमनोटे यांनी माहिती दिली

Feb 17, 2024 - 12:48
Feb 17, 2024 - 12:49
 0  116
डॉ. मोहन बमनोटे यांची आयुष भारत डॉक्टर असोसीयशनच्या विदर्भ अध्यक्ष पदी निवड

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow