हार्दिक विजयानंतर असं का म्हणाला, आमचं सर्व ठरलंय... रोहितचं संघातील भवितव्य काय जाणून घ्या !!

Apr 1, 2025 - 09:45
 0  19
हार्दिक विजयानंतर असं का म्हणाला, आमचं सर्व ठरलंय... रोहितचं संघातील भवितव्य काय जाणून घ्या !!

मुंबई : पहिलाच विजय मुंबई इंडियन्सच्या संघाने दणदणीत मिळवला. केकेआरच्या संघाचे मुंबईने वस्त्रहरण केले. या विजयानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने एक मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर रोहित शर्माचे मुंबईच्या संघातील भवितव्य काय असेल, हे आता समोर आले आहे.

मुंबईने फक्त ११६ धावांत केकेआरला रोखले. अश्वनी कुमार यावेळी मुंबईच्या विजयाचा नायक ठरला. पहिल्याच चेंडूवर त्याने अजिंक्य रहाणेला बाद केले पण तो तेवढ्यावर थांबला नाही. अश्वनीने त्यानंतर रिंकूसिंगसह मनीष पांडे आणि आंद्रे रसेल यांनाही बाद केले. या चौघांना बाद करणारा अश्वनी सामनावीर ठरला. पण सामन्यानंतर मात्र हार्दिक पंड्याने आपल्या वक्तव्याने रोहित शर्माच्या चाहत्यांचे टेंशन मात्र वाढवले.हार्दिक पंड्या सामना संपल्यावर म्हणाला की, " विजयानंतर मी समाधानी आहे. घरच्या मैदानात हा विजय मिळाला, याचा जास्त आनंद आहे. संघातील खेळाडूंनी आपली कामगिरी चोख बजावली. संघात कोणाला संधी द्यायची, हे नेहमीच मोठे आव्हान असते. पण आमचं सर्व ठरलेलं आहे. कधी काय करायचं, हे आम्ही ठरवलेलं आहे. संघात बरेच युवा खेळाडू आहेत आणि ते चांगली कामगिरी करत आहेत. अनुभवी खेळाडू त्यांना चांगली साथ देत आहेत. त्यामुळे एक कर्णधार म्हणून मला जास्त चिंता नाही. " या सामन्यात रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवायचे, हे आधीच ठरले होते, असे आता हार्दिकच्या बोलण्यावरुन समोर येत आहे. रोहित सध्या चांगल्या फॉर्मात नाही, त्यामुळे त्याला संघाबाहेर कधी करायचे, हेदेखील हार्दिकने ठरवले असेल, असे त्याच्या बोलण्यावरुन चाहत्यांना वाटत आहे. त्यामुळे आता रोहित मुंबई इंडियन्सच्या संघात प्रत्येक सामन्यात दिसेल, हे निश्चित नसल्याची चर्चा आता क्रिकेट वर्तुळात सुरु झाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow