धोनी खेळत असताना चेन्नईचा मुंबईसारखा Retired OUT चा निर्णय, ऋतुराजने मॅचनंतर सांगितलं खरं कारण !!
मुलानपूर : महेंद्रसिंग धोनी खेळत होता. चेन्नईचा संघ २२० धावांचा पाठलाग करत होता. चेन्नईला विजयासाठी मोठी फटकेबाजी करावी लागणार होती. पण ती मैदानात होताना दिसत नव्हती. त्यामुळे धोनी खेळत असताना चेन्नईच्या संघाने Retired Out करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चेन्नईच्या संघावर जोरदार टीका झाली. पण हा निर्णय चेन्नईच्या संघाने का घेतला, याचं खरं कारण चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने सामना संपल्यावर सांगितलं.ही गोष्ट घडली ती १८ व्या षटकात. त्यावेळी धोनी आणि डेव्हॉन कॉनवे हे दोघे फलंदाजी करत होता. कॉनवेने तर दमदार फलंदाजी करत अर्धशतक साकारले होते. धोनी कॉनवेच्या मदतीला आला होता आणि त्यामुळे ही जोडी आता चेन्नईला विजय मिळवून देऊ शकते, अशी आशा त्यांच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती. यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघानेही तिलक वर्माच्याबाबतीत असा निर्णय घेतला होता आणि त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. पण या गोष्टीची तमा न बाळगता यावेळी चेन्नईच्या संघानेही सामना सुरु असताना फलंदाजाला मैदानाबाहेर पाठवण्याचा मोठा निर्णय घेतला.
धोनी त्यावेळी ९ धावांवर खेळत होता आणि कॉनवेने ६८ धावांची दमदार खेळी साकारली होती. कॉनवे हा चांगलाच सेट झाला होता, तर धोनी काही मिनिटांपूर्वीच मैदानात आला होता. त्यावेळी चेन्नईला जिंकण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज होती. पण त्यावेळी चेन्नईच्या संघाने अखेर कॉनवेला मैदानाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आणि त्याला Retired OUT व्हावे लागले. कॉनवेने तर यावेळी अर्धशतक झळकावले होते, पण त्याला यावेळी संघाबाहेर का काढले, याचे उत्तर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने सामना संपल्यावर दिले.
ऋतुराज गायकवाड म्हणाला की, " कॉनवे हा चांगला फलंदाज आहे, त्याचे टायमिंग अप्रतिम आहे. वरच्या फळीत खेळण्यासाठी तो उपयुक्त खेळाडू आहे. जेव्हा खेळाडूला खेळता येणं कठीण होतं, तेव्हा हा खेळाडूला रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतला जातो. पण कॉनवे चांगली फलंदाजी करत होता. पण संघातील खेळाडूंच्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि ते त्यासाठी ओळखले जातात. कॉनवे जसा वरच्या फळीत चांगला खेळतो, तसा रवींद्र जडेजा हा एक चांगला फिनिशर आहे. तो हा सामना चांगल्यापद्धतीने फिनिश करेल, असे आम्हाला वाटले आणि त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला. त्यामध्ये कॉनवेची काही चुकी आहे किंवा तो चांगली फलंदाजी करत नव्हता, असे काहीच नाही. "
What's Your Reaction?








