संतोष देशमुख हत्येप्रकरणी तपासासाठी एसआयटी नेमली .....

Jan 1, 2025 - 19:49
 0  22
संतोष देशमुख हत्येप्रकरणी तपासासाठी एसआयटी नेमली .....

बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. याप्रकणाचा सध्या सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. तर आतापर्यंत याप्रकरणात मोठ्या घडामोडी घडलया आहेत. हत्येचा मास्टरमाईंड म्हणून ज्या वाल्मिक कराडांचे नाव समोर त्यांनी काल पोिसांसमोर येत आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याला केज कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यानंतर आता सरकारने महत्वाचं उचलत या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमली आहे. या समितीत ९ पोलीस अधिकारी आहेत. तर आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

१० जणांच्या एसआयटी टीममध्ये कोण कोण?

पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली

अनिल गुजर, पोलीस उप अधीक्षक

विजयसिंग शिवलाल जोनवाल, स. पो. निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड

महेश विघ्ने - पो.उ.निरीक्षक

आनंद शंकर शिंदे, पो. उ. निरीक्षक, केज

तुळशीराम जगताप, सहा. पो. उ.निरीक्षक

मनोज राजेंद्र वाघ, पोलीस हवालदार

चंद्रकांत एस. काळकुटे, पोलीस नाईक

बाळासाहेब देविदास अहंकारे, पोलीस नाईक

संतोष भगवानराव गित्ते, पोलीस शिपाई

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow