देवकमल केटरर्स मालकाची दादागिरी ; पोलिसांनी समज देऊन सुद्धा अरेरावी जाईना... दादागिरी करून बळजबरीने उचलून नेलेली दुचाकी पोलिसांच्या मध्यस्थी नंतरही केली नाही परत !!

Dec 30, 2024 - 23:23
Dec 31, 2024 - 00:09
 0  60
देवकमल केटरर्स मालकाची दादागिरी ; पोलिसांनी समज देऊन सुद्धा अरेरावी जाईना... दादागिरी करून बळजबरीने उचलून नेलेली दुचाकी पोलिसांच्या मध्यस्थी नंतरही केली नाही परत !!

ऋषिकेश देशमुख /जिल्हा प्रतिनीधी 

वर्धा  - गांधी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वर्धा शहराची शांतता व सुव्यवस्था जिल्ह्यातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हातात घेतल्याची नवीन घटना दिनांक 30 डिसेंबर रोजी हरिहर नगर उमरी मेघे वर्धा येथे घडली. 
आपला व्यवसाय कसा वाढवा व लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे फायद्याचे आमीश देऊन "पैसे वर्ष भराने द्या पण लग्न जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट आम्हालाच द्या"अशा प्रकारच्या भुलथापा देऊन, नंतर दोन-तीन महिन्यातच त्यांच्या कडे पैशाचा तगादा लावून, वेळेवर पैसे न दिल्यास , आठ ते दहा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना एकत्र करून बळजबरी ने त्या ग्राहकांकडून त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू टीव्ही, फ्रिज, वाहने जप्त करणे असे प्रकार शहरात घडत आहेत. हरिहर नगरातील देशमुख कुटुंबीयांसोबत सुद्धा असाच प्रकार काल घडला. घरातील व्यक्तींना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन मेन गेटला स्वतः देवकमल केटरर्स मालक सौरभ भेदरकर व त्याचे वडील अन्य ८ गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून कुलूप लावून घरातील व्यक्तींना बंद करून शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या व आजूबाजूच्या परिसरात, कॉलनीत मोठ मोठ्या आवाजात शिवीगाळ करत देशमुख कुटुंबाची आब्रू वेषीवर टांगली व बळजबरीने त्यांच्याकडील दुचाकी वाहन हे ऑटो क्रमांक MH32AJ1437  यात टाकून घेऊन गेले. देशमुख कुटुंबियाणी संबंधित झालेला प्रकार हा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करून, झालेल्या घटनेचे व्हिडिओ क्लिप पाठवल्यानंतर, रामनगर पोलीस स्टेशन ला लेखी तक्रार दिली.रामनगर पोलिसांनी सौरभ भेदरकर याची मध्यस्थी करत चांगलीच कानउघडणी केली. रामनगर पोलिसांनी बळजबरीने उचलून घेऊन गेलेल्या दुचाकी ही परत करायला सांगितल्यावर सुद्धा बातमी लिहिस्तोव अद्याप दुचाकी परत केली नाही. उलट पोलीस स्टेशनच्या बाहेर निघताच देशमुख कुटुंबियांना धमकी देत म्हणाला मी गाडी परत देत नाही तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या. रामनगर पोलीस स्टेशन हे माझ्या खिशातले आहे. बोलत निघून गेला. त्यामुळे देशमुख कुटुंब ग्राहक मंच तसेच मानव अधिकार आयोगाकडे धाव घेणार आहे. या प्रकारामुळे रामनगर पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.? आता राम नगर पोलीस प्रशासनातर्फे या प्रकरणी नेमकी काय ॲक्शन घेतल्या जाते याकडे सर्व शहराचे लक्ष लागले आहे.

(भाग १).........

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow