अकोलखेड मंडळातील शेतकऱ्यांना विम्याचा लाभ द्या...उमरा,पनज मंडळातील शेतकऱ्यांना लाभ,तर अकोलखेड मंडळावर अन्याय!!

Jun 24, 2024 - 19:09
 0  34
अकोलखेड मंडळातील शेतकऱ्यांना विम्याचा लाभ द्या...उमरा,पनज मंडळातील शेतकऱ्यांना लाभ,तर अकोलखेड मंडळावर अन्याय!!
अकोलखेड मंडळातील शेतकऱ्यांना विम्याचा लाभ द्या...उमरा,पनज मंडळातील शेतकऱ्यांना लाभ,तर अकोलखेड मंडळावर अन्याय!!

अहेमद शेख / अकोट

            अकोट तालुक्यातील उमरा व पणज या दोन महसूल मंडळाला संत्रा या पिकाचा मृग बहारचा विमा हेक्टरी ४० हजार रुपये मंजूर झाला.मात्र या दोन्ही मंडळाच्या मध्यभागी असलेले अकोलखेड मंडळात संत्रा या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड आहे.परिणामी मोठ्या प्रमाणात येथील शेतकन्यांनी संत्रा पिकाचा विमा काढला होता.परंतु दोन मंडळातील शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला असून अकोलखेड मंडळातील शेतकरी अद्यापही लाभापासून वंचित राहलेले आहेत.पुनर्रचित हवामान आधारीत फळ पीक विमा योजने अंतर्गत मृग बहार सन २०२३ मध्ये संत्रा पिकासाठी अकोट तालुक्यातील अकोट,उमरा,पणज,अकोलखेड ही महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आली होती.ही योजना अकोला जिल्ह्यासाठी एचडीएफसी ईर्गो जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत राबविण्यात आली होती.शासन निर्णयान्वये संत्रा पिकासाठी कमी पाऊस ता.१५ जून ते १५ जुलै व पावसाचा खंड ता.१६ जुलै ते १५ ऑगस्ट हे हवामान धोके समाविष्ट करण्यात आले होते.संत्रा पिकासाठी ता.१५ जून ते १५ जुलै या कालावधीत १२४ मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झाल्यास नुकसान भरपाई देय राहील.गेल्या वर्षी पुर्ण जुन हा कोरडा गेलता त्यामुळे संन्त्राचा मृग बहार फुटला नाही त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पंधरा जुन ते पंधरा जुलै या महिन्यात १२४ मी मी च्या आत मध्ये जर पाऊस पडला प्रती हेक्टरी ४० हजार रुपये शेतकऱ्यांना वीमा मिळतो मात्र ७९.१ एवढा शासकीय पाण्याचा अहवाल असून सुध्दा अकोलखेड महसुल मंडळ कोणत्या कारणांमुळे वगळले ते अजुन पर्यंत समजले नाही.त्यामुळे अजुन पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा झाले नाहीत.विमा कंपनीने दुजाभाव करुन अकोलखेड

मंडळातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळल्याचे बोलले जात आहे.शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास विमाकंपनीने हिरावून घेतला.त्यामध्ये झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई म्हणून फळ बागायतदारांना शासनाने हवामानावर आधारित फळपिक विमा हि योजना आणली मात्र त्याचा फायदा फळउत्पादक शेतकऱ्यांना कमी आणी विम्या कंपण्यांना जास्त असा आरोप येथिल शेतकरी करीत आहेत.पणज,उमरा,अकोलखेड,हे तीन महसूल मंडळे एकमेकांना लागुन

असल्याने हवामानाचा बदल एकाच मंडळात झाला काय असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला याच संदर्भात अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार,खासदार,कृषी विभाग यांना लेखी निवेदन सादर केले.यामध्ये उमरा मंडळ,पणज मंडळला हेक्टरी ४० हजार रुपये मिळाले त्यामुळे सर्व फळबाग शेतकऱ्यांचे संत्रा या पिकांचे नुकसान झालेले आहे.त्यामुळे अकोलखेड मंडळ मधील शेतकऱ्यांना पात्र लाभार्थी म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यात यावी अशी मागणी अकोलखेड मंडळातील शेतकरी वर्ग करीत आहे.त्यामुळे या मंडळातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.तीनही महसुल मडळात झालेली पावसाची आकडेवारी सदर विम्याच्या कालावधी मधील १५ जुन २०२३ /१५ जुलै २०२३ पर्यत अकोलखेड महसुल मंडळ ७९.१ पणज महसुल मंडळ ७९.१ उमरा महसुल मंडळ १०२.१ एवढि होती.सदर निवेदन देतेवेळी वैभव आतकड,शुभम गावंडे,प्रमोद काळणे,शेख साजिद,सागर भालतिडक,शिरीष महल्ले,ओमचंद महल्ले,लटकुटे,चेडे,यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

 

  १५ जून ते १५ जुलै या काळात ७९.१ अत्यल्प पाऊस झाला.तरीही देखील मदत मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली आहे. कंपनीने वस्तुस्थिती पाहून शेतकऱ्यांना ताबडतोब विमा रक्कम द्यावी.

      रमेश रामचंद्र खिरकर.

  सावकार ग्रस्त शेतकरी समिती विदर्भ प्रदेश अध्यक्ष बोर्डी.

गेल्यावर्षी संपूर्ण तालुक्यात पावसा अभावी संत्रा बागांमध्ये उत्पन्न झाले नाही.इतर खरीप पिकांनाही विहिरीचे पाणी देवुन पिके वाचवावी लागली चांगला पाऊस पडला असता तर संत्रा बागा फुटल्या असत्या सदर कंपनीने आकड्यांचा खेळ खेळु नये लवकरात लवकर अकोलखेड मंडळातील शेतकऱ्यांना विम्याचे पेसे द्यावे. 

         जगन्नाथ निचळ

   जि.प.सदस्य अकोलखेड सर्कल.

आकोट तालुक्यातील अकोलखेड,उमरा,पणज या तीन महसूल मंडळामध्ये या कालवधीत १२४ मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद हावामना केंद्राच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.कृषी अधिक्षक कार्यालयाचा अहवाल ही तेच सांगते त्यामुळे कंपनीने शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे

       स्वातीताई चंदन 

सरपंच ग्राम पंचायत बोर्डी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow