श्रद्धाळूंच्या श्रद्धेचा सागर तो श्री क्षेत्र श्रद्धासागर ! - प्रशांत महाराज...... गुरुमाऊली जयंती महोत्सवाला भक्तीमय प्रारंभ
आकोट/ता.प्रतिनिधी
गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराज १०७ व्या जयंती महोत्सवाला श्रद्धासागर येथे श्रद्धा भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला या महोत्सवात राज्यभरातून आलेल्या वासुदेव भक्तांच्या उपस्थितीने हे तिर्थक्षेत्र फुलून गेले आहे.
जिथं श्रद्धा आहे ते क्षेत्र भक्तीच्या बीजाच्या पेरणीसाठी सुपिक प्रांत आहे.श्रद्धाळूंच्या श्रद्धेचा सागर असलेल्या गुरुवर्य महाराजांच्या या पुण्यभूमीत भाविक श्रद्धा व भक्तीने न्हावून जातात.ही गुरुभक्ती प्रत्येकाला जगण्याची नवी उर्जा देते असे भावपूर्ण उद् गार ह.भ.प. प्रशांत महाराज यांनी या भक्ती सोहळ्यात प्रारभी भाविकांशी बोलतांना काढले
या महोत्सवाचा प्रारंभ पहाटे 'श्री गुरुंच्या' महाभिषेकाने झाला. तिर्थस्थापना गुरुभक्त सुरेंद्र पाटील चिकटे यांचे हस्ते सपत्निक झाली.तद्नंतर ग्रंथराजाचे पुजन होवून श्री ज्ञानेश्वरीचे सामुहिक पारायणाला सुरुवात झाली.पारायणपीठाचे नेतृत्व ह.भ.प.अंबादास महाराज करीत आहेत.पहिल्याच दिवशी गांवोगांवचे भाविक पारायणात सहभागी झाले.स्थानिक जिजाऊ मराठा सेवा संघ द्वारा पारायणाला बसलेल्या वाचकांना आसन व दुधाचे वाटप करुन सेवा अर्पण केली.केली.
दरम्यान जयंती महोत्सवाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष वासुदेवराव महल्ले यांचे हस्ते भागवत ध्वजाचे व गुरुश्रींच्या रजत मुर्तीचे पुजनाने झाले तद्नंतर गुरुवंदना पार पडली.यावेळी संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते.
दुपारचे सत्रात प्रा.गजाननराव चोपडे यांनी प्रवचनात गुरुवर्यानी विरचित अमृतानुभ चरित्र ग्रंथाचे निरुपण केले.रात्री ह,भ.प. प्रशांत महाराज ताकोते यांचे किर्तन पार पडले
या भक्ती सोहळ्यातील भाविकांचे उपस्थितीने श्रद्धासागर भूमी भक्तीने फुलून गेली.
सदाशिवराव पोटे व दादाराव पुंडेकरांच्या स्मृतींना उजाळा
जयंती महोत्सवाचा भव्य दिव्य मंडप,सुंदरतेने सजविलेल्या संतपीठावरील गुरुमाऊलीचे तैलचित्र सर्वावांचे लक्ष वेधून घेत आहे. या मंडपाला संस्थेचे दिवंगत उपाध्यक्ष स्व. दादाराव पुंडेकर,जेष्ठ विश्वस्त स्व.सदाशिवराव पोटे यांचे स्मृतीला उजाळा देणारे प्रवेश द्वार,मंदीरावरील नेत्रदिपक विद्युत रोषणाई वारकरी पताकांनी 'अवघी अवतरली पंढरी'असे भक्तीमय वातावरणाने जयंती महोत्सवाला प्रारंभ झाला आहे.
What's Your Reaction?








