धोनी नाही तर हा खेळाडू बाद झाला अन् सामना फिरला - वानिंडू हसरंगा !!
गुवाहाटी : चेन्नईच्या संघाचाा फक्त सहा धावांनी पराभव झाला. महेंद्रसिंग धोनीने संघाला जिंकवण्याचे प्रयत्न केले खरे, पण तो बाद झाला आणि संघाची विजयाची आशा संपुष्टात आल्याचे म्हटले गेले. पण धोनी नाही तर चेन्नईचा कोणता खेळाडू बाद झाल्यावर हा सामना फिरला, हे सामन्यात पुष्पा स्टाइल मारत चार विकेट्स काढणाऱ्या वानिंडू हसरंगाने सामना संपल्यावर सांगितले.
वानिंडू हसरंगाने यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदा पुष्पा स्टाइल आणली. वानिंडूने यावेळी राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कारण त्याने यावेळी चेन्नईचे चार महत्वाचे फलंदाज बाद केले आणि सामना फिरवला. वानिंडूने यावेळी चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, राहुल त्रिपाठी आणि विजय शंकर या चार फलंदाजांना बाद केले. चेन्नईच्या डावाला खिंडाॉर पाडण्याचे काम करत असताना वानिंडू यावेळी खास पुष्पा स्टाइल मारत असल्याचे सर्वांनी पाहिले.
कोणची विकेट ठरली टर्निंग पॉइंट..
सामना संपल्यावर वानिंडू हसरंगा म्हणाला की, " या सामन्यात गोलंदाजी करणे सोपे नव्हते. कारण चेन्नईकडे एकामागून एक दमदार फलंदाज आहेत. त्यांचा सामान करणे ही, सोपी गोष्ट नाही. खासकरून ऋतुराज गायकवाड हा चांगलाच सेट झाला होता. ऋतुराज हा चांगला फलंदाज आहे. तो या सामन्यात चांगली फलंदाजी करत होता. त्यामुळे त्याला बाद करणे आमच्यासाठी महत्वाचे होते. मी त्याला बाद करू शकलो, याचा मला जास्त आनंद आनंद आहे. शिवम दुबेची भन्नाट कॅच रायन परागने पकडली. पण ऋतुराजची विकेट ही आमच्यासाठी सर्वात महत्वाची ठरली. "
राजस्थानसाठी हा विजय सर्वात महत्वाचा असेल, कारण हा त्यांचा यंदाच्या आयपीएलधील पहिलाच विजय आहे. या विजयासह त्यांनी गुणांचे खाते उघडले आहे.
What's Your Reaction?








