दुचाकी बैलबंडीच्या मागच्या बाजूस घुसून युवक गंभीर रित्या जखमी

Mar 2, 2024 - 18:16
 0  36
दुचाकी बैलबंडीच्या मागच्या बाजूस घुसून युवक गंभीर रित्या जखमी
दुचाकी बैलबंडीच्या मागच्या बाजूस घुसून युवक गंभीर रित्या जखमी

प्रतिनिधी संतोष वाघमारे

धामणगाव रेल्वे

जुना धामणगाव जवळMH 27 C T6266 क्रमांकाची दुचाकी वर असणारा युवक हा बैलबंडीच्या मागच्या बाजूस घुसून गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. शिवाजीनगर चांदूर रेल्वे येथे राहणार शुभम शिंदे असे या युवकाचे नाव असल्याचे सांगितले असून हा चांदूर रेल्वे वरून धामणगावला जात असताना सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान त्याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने तो सामोर असलेल्या बैलबंडीच्या मागच्या बाजूस त्याची दुचाकी ही घुसली .यामध्ये त्याच्या दोन्हीही पायाला गंभीर अशी इजा झाली असून अपघात बघताच त्या ठिकाणी नागरिक आले व त्यांनी 108 वर फोन करून ॲम्बुलन्स बोलावली. लगेच ॲम्बुलन्स आल्यानंतर त्याला उपचाराकरिता धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले आहे. युवकांनी गाडी चालवताना वेगाची मर्यादा  जपून गाडी चालवावी व गाडीवर असताना मोबाईलवर बोलणे सुद्धा टाळावे असे त्यावेळी नागरिक चर्चा करीत होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow