अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश संघटक पदि सागर सवळे ची नियुक्ती जिद्द,चिकाटी, परिश्रम व लेखणी प्रति इमान असल्याने संघटने तर्फे करण्यात आली नियुक्ती

Mar 2, 2024 - 18:13
 0  24
अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश संघटक पदि सागर सवळे ची नियुक्ती   जिद्द,चिकाटी, परिश्रम व लेखणी प्रति इमान  असल्याने   संघटने तर्फे करण्यात आली नियुक्ती

प्रतिनिधी/-सुयोग गोरले

चांदुर बाजार /-  संघर्षातून आणि कठोर परिश्रमातून पत्रकारितेची सुरुवात करून आपल्या लेखणी प्रति ईमान राखणारे ग्रामीण भागातील समस्यांना वाचा फोडून  सकारात्मक पत्रकारितेची मूल्य जोपासणारे चांदूरबाजार येथील पत्रकार सागर सवळे यांची अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश संघटक पदि नियुक्ती करण्यात आली आहे तालुका ते महाराष्ट्रभर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणे मोठ-मोठ्यांना शक्य झाले  नाही ते कार्य केवळ आपल्या स्वतंत्र लेखणीच्या जोरावर सागर सवळे यांनी केले आहे चांदुर बाजार  गाव नागरिक म्हणून माझ्यासाठी अभिमानास्पद म्हणावे लागेल निर्भिड, निपक्ष, आणि स्वतंत्र पत्रकारिता करत आपला आणि आपल्या गावाचा नावलैकिक वाढविण्याचा सागर सवळे यांची मोलाची भूमिका नेहमी राहिली आहे असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही या करिता पत्रकार क्षेत्रात उत्तम कामगिरी  करत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश संघटक पदि नियुक्ती करण्यात आली आहे या करिता  अनेक महाराष्ट्र मधील सामजिक संघटना, राजकीय पक्ष,प्रशाकीय अधिकारी,  मिञ परिवार सर्वांकडून सागर सवळे याला हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहे या करिता आई सुवर्णाताई सवळे  व वडील सुरेशराव सवळे यांच्या कडून कौतुकाची थाप देऊन पुढील वाटचाली ला हार्दिक शुभेच्छा देण्यात आली आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow