ठाकरेंना धक्का! उमेदवाराची माघार, निवडणूक लढण्यास नकार !!

Oct 28, 2024 - 12:56
 0  21
ठाकरेंना धक्का! उमेदवाराची माघार, निवडणूक लढण्यास नकार !!

छत्रपती संभाजीनगर | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पहिल्याच उमेदवारी यादीत स्थान मिळवणाऱ्या किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. गेल्याच आठवड्यात ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली होती. पण आता त्यांनी पक्षाला तिकीट परत केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे. मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार जिंकू नये यासाठी तनवाणी यांनी माघार घेतल्याची माहिती पुढे आली आहे. एमआयएमनं छत्रपती संभाजीनगर मध्यमधून नासीर सिद्दीकी यांना तिकीट दिलं आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून महायुतीकडून शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल रिंगणात आहेत. ते इथले विद्यमान आमदार आहेत. त्यांना पक्षानं पुन्हा एकदा तिकीट दिलं आहे. त्यामुळे शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना विरुद्ध एमआयएम अशी तिहेरी लढत मतदारसंघात होणार होती. पण तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow