कुटुंबाला घात होण्याची भीती, श्रीनिवास वनगा अचानक नॉट रिचेबल !!
पालघर | शिवसेनेच्या पालघर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारल्याने या मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा व्यथित झाले आहेत. त्यांना अश्रू अनावर झाले असून दोन दिवसांपासून त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. आपल्या प्रामाणिक कार्याचे असे फळ पक्षाने दिल्याने ते उद्विग्न झाले आहेत. त्यांच्या मनात आत्महत्येचा टोकाचा विचार येत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. धक्कादायक म्हणजे काल रात्रीपासून ते कोणाच्याही संपर्कात नसल्याचे बोलले जात आहे.
त्यांचे दोन्ही फोन बंद आहेत. काल रात्री साडेसात-आठ वाजताच्या सुमारास ते अचानक घरातून निघून गेले. पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील आवेग व्यक्त केल्यानंतर ते घराबाहेर पडले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन श्रीनिवास यांच्या पत्नी सुमन वनगा यांना आला होता. ते माझंही ऐकत नाहीत, निघून गेले आहेत, असं सुमन यांनी शिंदेंना सांगितलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनगांना विधान परिषदेवर संधी देणार असल्याचा शब्द दिल्याचं सुमन यांनी सांगितलं.
What's Your Reaction?








