बारामतीत अजित पवारांनी नारळ फोडला; लोकसभेसारखा खडा..! आता विधानसभेत सावध !!

Oct 28, 2024 - 12:50
 0  28
बारामतीत अजित पवारांनी नारळ फोडला; लोकसभेसारखा खडा..! आता विधानसभेत सावध !!

 बारामती |  विधानसभेचे उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील कसब्यातून रॅली काढत अजित पवारांनी बारामती शहरामध्ये नागरिकांना अभिवादन करत मतदानाचे आवाहन देखील केले. यानंतर पारंपारिक रित्या श्री क्षेत्र कन्हेरी येथील मारुतीरायाला नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ देखील केला.

लोकसभा निवडणुकीत गाफिल राहिलेल्या अजित पवारांना सर्वाधिक विकास कामे केलेल्या बारामती शहरातच मोठा फटका बसला. तब्बल २३ हजारांचे मताधिक्य या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना मिळाले आणि राज्यात याची चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार यांनी नाना करत करत अखेर बारामतीतूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जाहीर केले आणि कार्यकर्त्यांच्या जीवात जीवा आला. अजित पवार बारामतीतून उमेदवारी जाहीर करणार की, नाही अशी सुरुवातीला चर्चा होती कारण तशी वक्तव्य अजित पवार यांनी वेळोवेळी केली होती. मात्र बारामती हाच आपला गड असून, राज्यात ताट मानेने फिरता येईल. एवढे मतदान बारामतीकर करतील असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow