ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे कालबाह्य लॅपटॉप तहसील कार्यालयाकडे जमा; नवीन लॅपटॉपची तातडीची मागणी!!

Dec 11, 2025 - 14:47
 0  8
ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे कालबाह्य लॅपटॉप तहसील कार्यालयाकडे जमा; नवीन लॅपटॉपची तातडीची मागणी!!

दैनिक जागर मराठी

घाटंजी : तालुक्यातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आलेले लॅपटॉप कालबाह्य झाल्याने महसूल विभागातील कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांच्या विविध कामांसाठी—सातबारा, फेरफार, पीक नोंदणी, प्रमाणपत्रे—यांसाठी हे लॅपटॉप अत्यंत महत्वाचे असून, संगणकीय साधनांअभावी ग्रामस्तरावर कामकाज मंदावले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाला अनेकदा तातडीची मागणी करूनही अद्याप नवीन लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे विलंबित होत असून, ग्राम महसूल अधिकाऱ्यांना कामकाज सुरळीत करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.याबाबत ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी कालबाह्य झालेले सर्व लॅपटॉप तहसील कार्यालयात जमा करून, तहसीलदार विजयसाळवे यांना नवीन लॅपटॉप उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले. तसेच “शेतकऱ्यांची कामे वेळेवर व्हावीत, सेवांचा दर्जा अबाधित राहावा” यासाठी तात्काळ नवीन लॅपटॉप उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया :
“महसूल प्रशासनाकडून तात्काळ नवीन लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात यावेत. अन्यथा आम्हाला बेमुदत कामबंद आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.”
— रामेश्वर कुमरे,
सहसचिव, विदर्भ पटवारी संघ, उपविभाग केळापूर

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow