तब्बल विस तासानंतर आढळून आला मृतदेह जिल्हा शोध व बचाव टीमला यश!!
दैनिक जागर मराठी
तिवसा : तिवसा ते सातरगाव मार्गावर असलेल्या कालव्यात गुरुवारी दि.१८ डिसेंबर रोजी ११:३० वाजताच्या सुमारास २१ वर्षीय ओम अरविंद सहारे रा. अमरावती हा तरुण वडिलांच्या समोरच हा पाय घसरून वाहून गेल्याची घटना घडली होती. शुक्रवारी सकाळी ८:३० वाजता दरम्यान घटनास्थळापासून काही अंतरावर जिल्हा शोध व बचाव पथकाला ओमचा मृतदेह मिळून आला. तिवसा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. वडिलांसोबत काम बघायला आलेला ओम हा कालव्यावर पाय धुण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याचा पाय घसरून तो कालव्यात पडला. वडिलांनीं जोरजोरात मदती हाक दिली. मात्र, तोपर्यंत ओम हा बऱ्याच लांब वाहून गेल्या आणि वडिलांनीं एकच हंबरडा फोडला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह बचाव पथक घटनास्थळी पोहचले. मात्र, सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा शोध व बचाव टीमने जवळपास आठ किलोमीटर पर्यंत शोध मोहीम राबविली. परंतु, कालव्यातील पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे ओम मिळून आला नाही. शुक्रवारी पाण्याची पातळी कमी होताच सकाळी ओमचा घटनास्थळापासून तीनशे मीटर अंतरावर मृतदेह आढळून आला. जिल्हा शोध व बचाव पथकात गजानन वाडेकर, सचिन धरमकर, विशाल निमकर, आकाश निमकर, सुमित बांबल यांच्या समावेत आपदा मित्र संदीप दाहाट यांनी मदतकार्य केले.
What's Your Reaction?








