सत्ता टप्प्यात दिसताच काँग्रेससमोर मुख्यमंत्री पदाचा पेच; पद एक, दावेदार अनेक !!

Oct 8, 2024 - 04:21
Oct 8, 2024 - 04:26
 0  32
सत्ता टप्प्यात दिसताच काँग्रेससमोर मुख्यमंत्री पदाचा पेच; पद एक, दावेदार अनेक !!

टीम जागर मराठी

हरियाणा | विधानसभेसाठी मतदान (दि. ५ ऑक्टोबर) पार पडल्यानंतर आता ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाची प्रतीक्षा सुरू झाली आहे. तत्पूर्वी मतदान संपताच अनेक माध्यमांनी त्यांचे एग्झिट पोल्सचे अंदाज जाहीर केले. बहुतेक एग्झिट पोल्सनी हरियाणाची सत्ता काँग्रेस पक्षाला मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सत्ता मिळणार, पण मुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. शनिवारी मतदान पार पडत असताना काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी बहुमत मिळणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी स्वतःला उघडपणे मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्याचे सांगितले.

द इंडियन एक्स्प्रेसने यासंबंधात एक लेख प्रकाशित केला आहे. ज्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी रस दाखविला त्यांनी हेही सांगितले की, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत, विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते भूपिंदरसिंह हुडा. २००५ ते २०१४ या काळात ते दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow