उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!!

Oct 9, 2024 - 18:56
 0  41
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!!

टीम जागर मराठी 

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे आज (दि.9) निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते.

रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योगविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. भारतीय उद्योगसमूहाचं एक प्रेमळ आणि सोज्वळ असं स्वरुप रतन टाटा यांचं होतं. टाटा उद्योगसमुहाचे चेअरमन एन चंद्रशेखर यांनी रतन टाटा यांच्या निधानाचे अधिकृत वृत्त दिले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow