शोषित,पीडित,वंचित,निराधार लोकांना न्याय देण्यासाठी महायुतीचे उमेदवार केवलराम काळे यांना भरघोष मतांनी विजयी करा-आमदार रवि राणा,चुरणी येथे महायुती कार्यकर्ता मेळावा संपन्न!!
चिखलदरा:प्रशांत पंडोले
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक सुरु आहे.अनेक आजी माजी आमदार,पार्टीतील कट्टर कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे.आता कोणाच्या नशिबी राज योग आहे.हे तर निवडणुकीच्या निकाल लागल्यावर समजणार.मेळघाटातील माजी आमदार केवलराम काळे महायुतीचे उमेदवार आहे.मेळघाटातील चुरणी येथे माजी खासदार नवनीत जी राणा यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती मित्रपक्ष कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे अध्यक्ष आमदार रवी राणा युवा स्वाभिमान पार्टी संस्थापक/अध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते.या सोबत महायुती मित्रपक्ष भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) शिवसेना (शिंदे गट) व इतर मित्रपक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्ता मेळाव्यात सर्व महायुतीचे व मित्रपक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ता यांना मार्गदर्शन करतांना आमदार रवी राणा यांनी सांगितले की, शोषित,पीडित,वंचित,निराधार,विधवा,अपंग यांना न्याय मिळवून देण्यासाठी केवलराम काळे यांना भरघोष मतांनी विजयी करा.मेळघाटातील गोर-गरीब जनतेच्या सुख-दुःखात तत्परतेने नेहमी धावत जाणारे केवलराम जी काळे हे आहे.केवलराम काळे यांनी मागील त्यांच्या कार्यकाळात मेळघाटच्या विकासासाठी करोडो रुपये आणले आहे.सर्वधर्म समभाव जपणारे आणि सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालणारे अशी ओळख मेळघाटात केवलराम काळे यांची आहे. मेळघाटातील सर्वांगीण विकासासाठी केवलराम काळे यांना भरघोष मतांनी विजयी करा.महायुती भाजप उमेदवार केवलराम काळे यांनी उपस्थित महायुती कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतांनी सांगितले की, मी माझ्या समाजातील अखेरचा घटकांसाठी पूर्ण ताकदीने काम करेल, त्यांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार,मी सर्वधर्म समभाव व सर्व जाती धर्मासाठी पूर्ण निष्ठेने काम करेल,वंचित,शोषित,पीडित,निराधार,विधवा, अपंग लोकांना न्याय मिळवून देणार असे मत या प्रसंगी व्यासपीठावरून केवलराम काळे यांनी व्यक्त केले.या प्रसंगी चिखलदरा तालुक्यातील महायुतीचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट)शिवसेना (शिंदे गट) व इतर महायुती मित्रपक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?








