वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय तिरंगी रंगात ; मनमोहक रोषणाई ने वेधले वर्धेकरांचे लक्ष !!

Aug 15, 2024 - 18:11
 0  31
वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय तिरंगी रंगात ; मनमोहक रोषणाई ने वेधले वर्धेकरांचे लक्ष !!

वर्धा प्रतिनिधी ,

       वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाची वास्तू आज स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगी रंगात न्हाऊन निघाली आहे. वास्तूच्या मनमोहक रोषणाईने वर्धेकरांचे लक्ष वेधले असुन स्थानिक नागरिक ही रोशनी पाहण्याकरिता गर्दी करीत आहे.

       राज्यातील सर्वात उत्कृष्ट प्रशासकीय इमारत अशी पावती खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यास ‘चार चांद’ लावण्याचे काम जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व चमूने केले आहे. विविध रंगात ही इमारत आज न्हावून निघाली आहे. ही इमारत गो ग्रीन संकल्पनेवार आधारित आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोत हे शक्तीस्थान आहे. भारतीय स्थापत्य शैली प्रेरणा आहे. तळ मजल्यावर पालकमंत्री, जिल्हाधिकारी कक्ष तसेच ३०० आसन क्षमतेचे नियोजन सभागृह तयार आहे. दिव्यांग तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह आज सेवेत आहे.इंग्रजकालीन इमारत पाडून ही नवी इमारत उभारण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow