तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सर्वात मोठी बातमी, डॉ. घैसास यांचा राजीनामा ....
पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात ज्या डॉक्टरांवर गंभीर आरोप झाले त्या डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. हॉस्पिटल प्रशासनाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहता सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. सुश्रुत भिसे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी मोठा वाद झाल्यानंतर आता डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन आज संध्याकाळी पाच वाजता पत्रकर परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण त्याआधीच तनिषाच्या मृत्यूला जबाबदार मानले जाणाऱ्या डॉ. घैसास यांनी राजीनामा दिला आहे. डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. या प्रकरणात आता काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
What's Your Reaction?








