माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड यांचे निधन...
शेख युनुस/नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नांदेड '- कासराळी ग्रामपंचायत सरपंच ते आमदार अशी मजल मारणारे माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड साहेब यांचे (दि. 07 मार्च) रोजी मध्यरात्रीनंतर वृद्धापकाळाने वयाचा 85 व्या वर्षी निधन झाले.
त्यांचा अंत्यवविधी ( दि.08 मार्च) साय 4:00 वाजता अमृतधाम गो-शाळा कासराळी येथे होणार आहे.
जिल्ह्याचा राजकारणात, समाजकारणात निष्कलंक व चारित्र्यसंपन्न अशी लौकिक निर्माण केले बिलोली देगलुर माजी.आमदार गंगारामरामजी ठक्करवाड साहेब त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी,मुल,मुली,जावई,नातवंड असा मोठा परिवार आहे.
What's Your Reaction?








