ख.वि.स.च्या अध्यक्षपदी हिदायत पटेल व उपाध्यक्षपदी शेषराव वसू यांची अविरोध निवड

Feb 24, 2024 - 17:16
 0  68
ख.वि.स.च्या अध्यक्षपदी हिदायत पटेल व उपाध्यक्षपदी शेषराव वसू यांची अविरोध निवड

आकोट/ता. प्रतिनिधी 
आकोट ख.वि.स.च्या अध्यक्षपदी हिदायत पटेल व उपाध्यक्षपदी शेषराव वसू यांची अविरोध निवड झाली आहे.या निवडीचे संस्थेच्या भागधारक शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.
खविसच्या मुख्यालयात पार पडलेल्या नवनियुक्त संचालकांचे सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहा.निंबधक वैषाली विटणकर यांनी निवाडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी संचालक सर्वश्री 
हिदायत पटेल,शेषराव वसू, रमेश हिंगणकर ,सुभाषराव मगर ,हरीभाऊ मानकर, सुरेंद्र ठाकरे, माधवराव बकाल,संतोष पुंडकर ,कुलदिप भिसे,मनोहरराव सावरकर,अनोख राहणे,दयाराम धुमाळे  दत्तात्रय तळोकार , दिपक पवार , त्र्यंबकराव मंगळे,श्रीकृष्ण रोठे , अरुणराव जवंजाळ विनायकराव इंदोरे, विजेंद्र तायडे सौ.वृषालीताई दत्तात्रय ओळंबे व श्रीमती सविताताई सदाशीवराव पाटकर उपस्थित होते.

नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सत्कार
-------------------------------------------- 
दरम्यान सहकार परिवार व कृउबास व सहकार जिनिंग, व विविध संस्थांचे वतीने वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष हिदायत पटेल,उपाध्यक्ष शेषराव वसू यांचा जल्लोषात सत्कार पार पडला.अध्यक्षस्थानी सहकार परिवाराचे अध्यक्ष नानासाहेब हिंगणकर  होते. शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललितदादा बहाळे,
काॕग्रेस नेते डाॕ.अभय पाटील , कृउबासचे सभापती प्रशांत पाचडे उपसभापती अतुल खोटरे व  सर्व संचालक सहकारी  जिंनिंगचे अध्यक्ष सुभाषराव वानखडे व सर्व संचालक ,कृउबासचे माजी  सभापती शंकरराव चौधरी व विविध संस्थाचे पदाधिकारी व काॕग्रेस व सहकार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow