निवडणुक लढवणार आणि मताधिक्याने जिंकणार- चंद्रसेन पाटील!!
कंधार/शेख शादुल
--------------------
लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी, बहुजन समाजाला एकत्रित करण्यासाठी मी आगामी विधानसभेची निवडणुक शंभर टक्के लढवणार आणि मोठ्या मताधिक्याने जिंकणार असल्याचं वक्तव्य माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी केलं
रविवारी, २९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता लिंबोटी फाॅर्महाऊस येथे आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी बौद्ध व मातंग समाज बांधवांची संवाद बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर खऱ्या अर्थाने ओबीसी समाज एकवटला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात जागृत झाला आहे. माझ्या पाठीमागे ओबीसी समाज खंबीरपणे उभा टाकला आहे. माळाकोळी ता.लोहा येथे मला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी काढलेल्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे स्वागत करण्याचं भाग्य मिळालं. मी वंचित बहुजन आघाडी पक्षाचा सभासद झालो. पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मागितली. परंतु मला काही जणांनी उमेदवारी मिळवू दिली नाही. लोहा-कंधार मतदारसंघात बौद्ध, मातंग आणि ओबीसी समाजाची ताकद मोठी आहे. जर हे तिन्ही समाज एकत्रित आल्यास मोठी क्रांती घडणार आहे. आमदारकी व इतर स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात येणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत मी आगामी लोहा विधानसभेची निवडणुक शंभर टक्के लढवणार आहे. मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे. माझ्याकडे विजयाच गणित व विकासाच व्हिजन आहे. सर्वांनी मला साथ द्यावी. आयुष्यभर आपल्या ऋणात राहिल असे ते म्हणाले.
यावेळी लोहा कृउबा समितीचे संचालक केरबा केंद्रे, संचालक केशवराव तिडके, रिपब्लिकन सेनेचे अनिल गायकवाड, आंबुलगाचे सरपंच माधव मुसळे, दहिकळंबाचे सरपंच शंकरराव राक्षसे, माजी उपसरपंच अरुण सोनटक्के शाहीर बापुराव जमदाडे, शाहीर विलास ढवळे, डॉ.विश्वनाथ राठोड, कृष्णा केंद्रे, अनिल सुर्यवंशी, प्रेमानंद गायकवाड, सिध्दार्थ कांबळे, बबन जोंधळे, सचिन आढाव, विहान कदम, सुमेध पवार, सिध्दार्थ पवार, गोपीनाथ कांबळे, तुकाराम कांबळे, शिरसे सर, नवनाथ आढाव, गौतम सोनकांबळे आदींसह असंख्य बौद्ध व मातंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?








