तालुक्यात 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा !!

Aug 16, 2024 - 14:38
 0  27
तालुक्यात 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा !!

प्रतिनिधी ,संतोष वाघमारे

धामणगाव रेल्वे,

तालुक्यामध्ये 78 व स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शासकीय कार्यालय तसेच सर्व शाळा ,महाविद्यालय व अनेक ठिकाणी राष्ट्रगीत व झेंडा वंदन करून सर्व नागरिकांनी विद्यार्थी, महिला, पुरुष, युवक, युवती यांनी एकमेकांना 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या .बोरगाव धांदे येथे आयुष भारत डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉक्टर विनोद देशमुख यांच्या श्री चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र च्या परिसरामध्ये झेंडावंदन राष्ट्रगीत व मेडिकल कॅम्प तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच आयुष भारत चे डॉक्टर यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रुती उईके सरपंच बोरगाव धांदे ,उद्घाटक चंदू राऊत ,सामाजिक कार्यकर्ते विलास धांदे प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष संतोष वाघमारे हे होते. तसेच किशोर बमनोटे अमरावती जिल्हाध्यक्ष आयुष भारत डॉक्टर असोसिएशन ,मोहन बमनोटे विदर्भ अध्यक्ष ,डॉक्टर विपुल पाटील वर्धा जिल्हा अध्यक्ष ,डॉक्टर अमित साखरे आर्वी ,डॉक्टर प्रफुल ताजणेकर ,डॉक्टर अलोक बिश्वास ,डॉक्टर पंकज येसनकर, वर्धा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अंबड, तसेच अवनी एंटरप्राइजेस च्या संचालिका आम्रपाली पाटील ,प्रगती माटे यांनी उपस्थिती लावली होती. सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त करून अल्पपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow