खासदार बळवंत वानखडे यांनी कुलुप तोडून घेतला खासदार कक्षाचा ताबा...!

Jun 22, 2024 - 12:41
 0  18
खासदार बळवंत वानखडे यांनी कुलुप तोडून घेतला खासदार कक्षाचा ताबा...!

अमरावती | लोकसभा मतदार संघाच्या खासदार पदी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे निवडून आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदार शासकीय कार्यालय ताब्यात देण्यात यावे यामागणीसाठी वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून , भेटून विनंती सुद्धा करण्यात आली. मात्र, वारंवार विनंती करूनही खासदार कार्यालयाचा ताबा न दिल्याने आज खासदार बळवंत वानखडे, आमदार.अडो यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत कार्यालय ताब्यात देण्याची विनंती केली. परंतु जिल्हाधिकारी यांनी कार्यालय ताब्यात न दिल्याने आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार अशी घोषणाबाजी करत खासदार कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालय ताब्यात घेतल्याचे चित्र समोर आहे . अमरावतीचे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त भाजप सरकारच्या दबावात काम करीत असल्याचा खळबळजनक आरोप देखील यावेळी खासदार बळवंत वानखडे व आ. यशोमती ठाकूर यांनी केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow