भारतीय रेल्वे ने प्रवाशांकरीत लॉंच केले नवीन सुपर ॲप ; ' स्वरेल ' नेमक काय आहे या ॲप मध्ये ?

Feb 1, 2025 - 12:59
Feb 1, 2025 - 13:45
 0  21
भारतीय रेल्वे ने प्रवाशांकरीत लॉंच केले नवीन सुपर  ॲप ; ' स्वरेल ' नेमक काय आहे या ॲप मध्ये ?

भारतीय रेल्वेने त्यांच्या प्रवाशांच्या सोयीसाठी एक नवीन सुपर ॲप लाँच केले आहे. रेल्वेने SWAREL हे बहुप्रतिक्षित ॲप लाँच केले आहे. नवीन ॲप प्रवाशांसाठी प्रचंड फायद्याचे ठरणार आहे, कारण या एका ॲपमध्ये युजर्सना अनेक सुविधा मिळणार आहेत. SWAREL हे प्रवाशांना अनेक रेल्वे सेवांसाठी वन-स्टॉप सोल्यूशन देईल. SWAREL सुपर ॲप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम (CRIS) ने विकसित केले आहे. या सुपर ॲपची बीटा आवृत्ती आता अँड्रॉईड युजर्ससाठी Google Play Store आणि आयफोन युजर्ससाठी Apple App Store वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. प्रवाशांना त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तर आता एका सुपर ॲपमध्ये मिळणार आहेत.

SWAREL Super App काय आहे?

‘SWAREL’ रेल्वेच्या विविध सेवांना एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित करते, ज्यामुळे प्रवाशांसाठी त्यांचा प्रवास मॅनेज करणं अधिक सोपं होतं. विद्यमान वापरकर्ते त्यांचे RailConnect आणि UTSonMobile क्रेडेन्शियल वापरून लॉग इन करू शकतात. यासह, युजर्स युनिफाइड अकाऊंटद्वारे अनेक सेवांमध्ये प्रवेश करू शकतील. SWAREL बाबत भारतीय रेल्वेनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

सुपर ॲपमध्ये युजर्सना मिळणार या सुविधा

CRIS द्वारे विकसित केलेले हे सुपर ॲप भारतीय रेल्वेच्या सर्व पब्लिक-फेसिंग ऐप्लिकेशन्सना एकाच प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रित करते. ॲप वापरकर्त्याच्या विविध गरजा पूर्ण करतो, ज्यामुळे युजर्सचा प्रवास अधिक सुखाचा होतो.

  • आरक्षित तिकीट बुकिंग
  • अनारक्षित तिकिटे आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग
  • पार्सल आणि फ्रेट इन्क्वायरी
  • ट्रेन आणि PNR स्टेटस इन्क्वायरी
  • ट्रेनमध्ये जेवणाच्या ऑर्डर
  • तक्रार व्यवस्थापनासाठी रेल्वेची मदत

सोशल मीडियावर अधिकृत घोषणा

सोशल मीडियावर ॲप लाँच केल्याची घोषणा करताना CRIS म्हणाले, ‘प्रिय ग्राहकांनो, तुमची प्रतीक्षा संपली आहे! भारतीय रेल्वेने बीटा चाचणी अंतर्गत आपले सुपर ॲप लाँच केले आहे. हे ॲप विविध रेल्वे सेवांसाठी वन-स्टॉप सोल्यूशन म्हणून काम करते. ज्यामुळे युजर्सना बराच फायदा होऊन त्यांचा प्रवास देखील अधिक सुखकर होतो.

SWAREL डाउनलोड कसे करायचे?

बीटा आवृत्ती सध्या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध आहे. इच्छुक वापरकर्ते खालील लिंक वापरून ॲप डाउनलोड करू शकतात:

प्ले स्टोअर: https://play.google.com/apps/testing/org.cris.aikyam

ॲप स्टोअर: https://testflight.apple.com/join/aWFYt6et

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow