प्रशांत किशोर यांनी केली ‘जन सुराज’ पक्षाची घोषणा, रणनीतीकार आता राजकीय आखाड्यात !!

Oct 2, 2024 - 15:37
 0  18
प्रशांत किशोर यांनी केली ‘जन सुराज’ पक्षाची घोषणा, रणनीतीकार आता राजकीय आखाड्यात !!

प्रशांत किशोर  यांनी जन सुराज पक्षाची घोषणा पाटणा येथील व्हेटरनरी महाविद्यालयाच्या मैदानावर केली. यानंतर ते लोकांना संबोधित करत म्हणाले की मागच्या अडीच वर्षांपासून जन सुराज पक्ष आणण्याची तयारी सुरु होती. सगळे लोक विचारत होते की तुम्ही पक्षाची घोषणा कधी करणार? आज मी ही घोषणा केली आहे. आयोगाने आम्हाला अधिकृतरित्या पक्षाचा दर्जा दिला आहे. हे नाव योग्य आहे ना? असंही प्रशांत किशोर यांनी जमलेल्या गर्दीला विचारलं. सगळ्यांनी अनुमोदन दिलं आहे. पक्षाच्या स्थापनेच्या आधी प्रशांत किशोर यांनी जी मोहीम चालवली त्यात त्यांनी चंपारण येथून राज्याची सुमारे ३ हजार किलोमीटरची पदयात्रा केली. ही पदयात्रा दोन वर्षांपूर्वी सुरु झाली होती. महात्मा गांधी यांनी देशातला पहिला सत्याग्रह सुरु केला होता. २ ऑक्टोबरच्या दिवशी म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी त्यांनी पक्षाची घोषणा केली आहे. बिहारच्या जनतेला आता नव्या राजकीय पक्षाचा पर्याय या निमित्ताने निर्माण झाला आहे.

बिहारमध्ये आज मी एक नारा देतो आहे, तो नारा आहे जय बिहार! असं प्रशांत किशोर म्हणाले. प्रशांत किशोर यांनी हा नारा देऊन लोकांनाही त्यांच्या पाठोपाठ ही घोषणा दिली. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना बिहारी असं हिणवत कुणीही बोलू नये म्हणून जय बिहारची घोषणा द्या असं प्रशांत किशोर म्हणाले. आज अशी घोषणा द्या की दिल्लीपर्यंत आपला आवाज पोहचला पाहिजे. असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow