सांगली MIDC मधील कंपनीत वायूगळती, दोन महिलांचा मृत्यू; शहरात खळबळ !!
सांगली : कडेगाव तालुक्यातील शाळगावमधील MIDC मधील म्यानमार केमिकल कंपनीमधून मोठ्या प्रमाणावर वायूगळती झाल्याची माहिती समोर आली आहे. या विषारी वायूमुळे अनेक लोक गंभीर झाले असून यातील ५ लोकांना कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही नागरिकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अनेक जणांना या वायूची बाधा झाली आहे. तर प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत वायूगळती थांबवली.
What's Your Reaction?








