आदर्श पालक होण्याचे कर्तव्य पार पाडा, आपल्या मुलांना पोलिओचे डोस पाजा :- पक्षीमित्र अरुण शेवाणे यांचे आवाहन
अंजनगावसुर्जी/प्रतिनिधी
अंजनगावसुर्जी :- शासनातर्फे पल्स पोलिओची मोहीम मार्च पासून सुरु होणार आहे. 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ डोस दिल्या जाणार आहे. शासनाने पल्स पोलिओ मोहीम 3 मार्च रोजी राबविण्याचे ठरविले आहे. या मोहिमेअंतर्गत ज्या कुटुंबा पर्यंत आशा वर्कर पोहोचत असतात, त्या आशा वर्कर संपावर असल्याने त्यांची वाट न बघता येणाऱ्या रविवारी म्हणजेच 3 मार्च 2024 ला आपल्या घरातील, गावातील ,परिसरातील 0 ते 5 वर्ष असलेल्या बालकांना आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडीत नेऊन पोलिओचा डोस द्यायला विसरू नका, कारण आशा वर्कर आपल्या न्याय हक्कासाठी बेमुदत संपावर असल्यामुळे त्याचा फटका 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना बसण्याचे चिन्ह आहेत. म्हणून आदर्श पालक होण्याचे कर्तव्य पार पाडून आपल्या मुलांना पोलिओचा डोस पाजा आणि आपल्या लाडल्यानां पोलिओ मुक्त करा असे पक्षीमित्र तथा रुग्णसेवक अरुण शेवाणे यांनी आवाहन केले आहे. तसेच रानावनात मेंढर, गाई ,म्हशी चालण्यासाठी शेतात राहूट्या करून रहात असणाऱ्या कुटुंबाकडे पोलिओ डोस घेण्यासाठी जवळच्या पोलिओ डोस केंद्रावर ये-जा करण्यासाठी व्यवस्था नसेल अशा कुटुंबाने पक्षीमित्र अरुण शेवाणे यांच्या 9326706910 या क्रमांकावर संपर्क साधावा. जेणेकरून पल्स पोलिओ डोस पासून कोणीही वंचित राहणार नाही.
चला तर मग! या राष्ट्रीय कार्यात स्वयंपुरतीने सहभागी होऊ या! आणि आपल्या लाडल्यानां पोलिओ डोस पाजून "आदर्श पालक होण्याचे कर्तव्य पार पाडून पोलिओ मुक्त भारत घडवूया " असे आवाहन पक्षीमित्र तथा रुग्णसेवक अरुण शेवाणे यांनी केले आहे.
What's Your Reaction?








