अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू !!
प्रतिनिधी संतोष वाघमारे
धामणगाव रेल्वे | अज्ञात वाहनाच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अशोक नगर गुंजी रोडवर घडली आहे .प्रवीण चरणदास कडू वय वर्ष 45 असे मृतक युवकाचे नाव असून अशोक नगर येथील तो रहिवासी होता. प्रवीण हा अशोक नगर येथे एकटाच राहत असून तो अविवाहित होता. गुंजी वरून अशोक नगर येथे पायदळ जात असताना शुक्रवार रात्री दहा वाजता च्या दरम्यान एका चार चाकी अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. त्या धडकेत प्रवीण याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती कुऱ्हा पोलिसांना मिळताच घटनास्थळी कुऱ्हा पोलीस स्टेशनचे पोलीस स्थूल ,शरद अहिर ,विकास बिरे, सागर निमकर हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनेचा पुढील तपास कुऱ्हा पोलीस करीत आहे.
What's Your Reaction?








