सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी यांनी सुनावलं...
बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी इथे आले आहे. दीड महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. दीड महिने मी शांतपणे सामोरे जात आहे. ट्रोलिंगला, निगेटिव्ह कमेंटला मी शांतपणे सामोरे जात आहे. शांतता ही माझी मुक संमती नाही. माझ्यासारख्या अनेक महिला, कलाकार यांची ही हतबलता आहे. आता हे शांत राहणं तुमच्यामुळे आमच्यावर बेतलं आहे. एक व्यक्ती रागाच्या भरात उद्वेगाच्या भरात काही तरी बरळून जाते. त्या दोन वाक्याचे मीडियामध्ये हजारो व्हिडीओ बनवले जातात. चिखल फेक सुरू राहाते. महिलांची अब्रू निघत राहते. यांचं मनोरंजन होतं. हे होऊ नये. समाज माध्यमांसमोर चिखलफेक होऊ नये, म्हणून मी यात पडले नाही. या गटारात दगड टाकणं योग्य वाटलं नाही.या आवया जशा उठताता तशा निघून जातात, घरच्यांचा, सहकाऱ्यांचा माझ्यावर एवढा दांडगा विश्वास होता की मला माझ्या चारित्र्याचा खुलासा करण्यासाठी पुढे यावं याची कधी गरज वाटली नाही. मात्र आज ही वेळ आलीये. ही अत्यंत नामुष्की आहे. कारण लोकप्रतिनिधी त्यावर प्रतिक्रिया देतात. रुमरला स्थान नाही. पण वावटळीवर लोकप्रतिनीधी बोलतात. ज्यांना आपण निवडून दिलं. ज्यांनी विधीमंडळात बोलावं, आपल्या हक्कांचं रक्षण करावं, आपल्यासाठी न्याय मागावा, अशी आपली ज्यांच्याकडून अपेक्षा आहे, अशी मंडळी जेव्हा चिखलफेक करतात तेव्हा ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची वेळ येते, असं प्राजत्का माळी यांनी म्हटलं आहे.
What's Your Reaction?








