भाजपचा बडा नेता ठाकरेंच्या गळाला; दसऱ्यानंतर सीमोल्लंघन होणार!!
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचं वार उलट्या दिशेने फिरू लागलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा गेल्या दोन तीन वर्षांत भाजपमध्ये प्रवेश करणारे अनेक माजी आमदार, नगरसेवकांसह अनेक पदाधिकारीही पुन्हा आपल्या मुळ पक्षांत परतताना दिसत आहेत.त्यामुळे महायुतीच टेन्शन मात्र चांगलयचं वाढलं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जोरदार इमकमिंग सुरू आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटात जाण्यासाठी अनेक इचछुकांनी रांगा लावल्या आहेत. अशातच कोकणातील भाजपचा बडा नेत्या सध्या उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असून त्यांनी संबंधित नेत्याने त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
रत्नागिरीचे भाजप नेते बाळ माने सध्या ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. नुकतीच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी बाळ माने आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली आहे.बाळ माने यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केल्यास उद्धव ठाकरे यांची कोकणात ताकद वाढणार आहे. तर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जाणार आहे. बाळ माने हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.
What's Your Reaction?








