सुदर्शन नाईक दूरदृष्टी असणारे तरुण नेतृत्व!!
दैनिक जागर मराठी
जनतेची व कार्यकर्त्यांची जाण असणारा कार्यसम्राट नेता सुदर्शन नाईक हे एक दूरदृष्टी असणारे तरुण नेतृत्व नव्याने राजकीय पटलावर आपल्या कर्तुत्वाने व सामाजिक उत्तरदायित्वाने पुढे येत आहे. खरतर नाईक हे शिवसेना शिंदे गटाचे सक्षम युवा नेतृत्व त्यांची ओळख तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक हे सामाजिक, राजकीय व शिक्षणासारख्या चळवळीमध्ये धडाडीने आपल्या कामाची छाप सोडत आहेत. तळागाळातील सामान्यतल्या सामान्य जनतेला व शोषित वंचित घटकाला विविध घटकातील गरजवंताला नेहमी मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे नाईक अशी नव्याने ओळख किनवट माहूर मतदार संघात निर्माण होत आहे. राजकीय क्षितिजावर शिवसेना शिंदे गटामध्ये तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक यांच्या रूपाने नव्या नेतृत्वाचा उदय होत आहे ही बाब सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी असून विरोधकांच्या गोटामध्ये धडकी भरवणारी आहे. अत्यंत प्रामाणिक व कुशल नेतृत्व गुण असलेले नाईक हे उच्च विद्या विभूषित असून त्यांना जनतेच्या प्रश्नांची व अडीअडचणीची जाणीव आहे. तळागाळातील अनेक गरजवंताला त्यांनी मदतीचा हात दिला आहे. ग्राम पातळीवर तरुण वर्गामध्ये रोजगाराविषयी जाणीव जागृती करण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी अनेक वेळा सरकार दरबारी अर्ज विनंती व मोर्चाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे. एवढेच नव्हे तर आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सामाजिक जीवनात समाजातील तरुण तरुणींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन अनेकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम अतिशय धाडसाने सुदर्शन नाईक यांनी केलेले आहे आणि अविरतपणे करत राहणार आहेत. समाजातील महिलांच्या अनेक समस्येवर त्यांनी विचार मंथन केले आहे. समाजातील महिलांचे शिक्षणातील प्रमाण वाढवण्यासाठी मुलींना प्रोत्साहन दिलेले आहे. मुलींच्या शिक्षणातील गळती थांबवण्यासाठी वेगवेगळे शिक्षण मेळावे आयोजन करून प्रबोधनाचे कार्य त्यांनी हाती घेऊन मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आणि मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. यातून त्यांची सामाजिक बांधिलकी व संवेदनशीलता प्रकर्षाने दिसून येते. समाजकारणाचा प्रदीर्घ अनुभव घेतल्यानंतर त्यांनी राजकारणातही प्रभावीपणे आपली भूमिका व समाजाविषयीची तळमळ सातत्याने प्रगट केलेली आहे. किनवट माहूर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून सहाय्यता अनेक नागरिकांना नेहमी मदत केली आहे.जनसामान्यांच्या भावनांचा आदर करून व गरजवंतांच्या गरजा समजून घेऊन समस्या सोडवण्याचे कसब नाईक यांना अतिशय उत्तम प्रकारे जमते. हीच त्यांच्या कार्यक्षमतेची व कर्तव्य तत्परतेची झलक सर्वसामान्यांना भावते. किनवट माहूर मतदार संघाच्या राजकारणामध्ये तरुण तडफदार नेतृत्वाचा सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात बोलबाला होत असल्याचे बोलल्या जात आहे. अशा या उदयोन्मुख तरुण नेतृत्वाचा अर्थात नाईक यांचा आज जन्मदिवस. दिनांक 20 डिसेंबर रोजी त्यांच्या व नामदार श्री हेमंतभाऊ पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त किनवट माहूर मतदारसंघांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप व तसेच नोटबुकचे 20 हजार प्रति गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असून विविध सामाजिक हित जोपासनाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष आणि उत्साह दिसून येत आहे. त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी व देदीप्यमान कारकिर्दीसाठी सद्भावना व्यक्त करून मी माझ्या शब्दाला पूर्णविराम देतो.
लेखक
गोपाल नाईक, पत्रकार
श्रीक्षेत्र माहूरगड
मो. 7499854591
What's Your Reaction?








