बुबळी ग्रामपंचायत येथ प्रधान मंत्री पिक विमा योजनेचे शेतकऱ्यांना मार्गदर्श !!
प्रतिनिधी/ मनोहर जाधव
हतगड- सुरगाणा तालुक्यातिल बुबळी ग्रामपंचायत येथे कृषी विभाग व अग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी इंडिया लि.अंतर्गत प्रधान मंत्री पिक विमा योजना प्रचार प्रसिद्धी पाठशाळा तसेच शेतकरी भेटी अशा विविध माध्यमातून पिक विमा योजनेची प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. रब्बी हंगाम २०२५ साठी नाशिक जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी लि. या कंपनीची निवड झालेली आहे, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पिक विमा योजनेत सहभागी व्हावे यासाठी शासन स्तरावर विविध प्रकारे प्रचार प्रसार करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. त्यामध्ये सध्या तालुक्यामध्ये रब्बी हंगाम चालु असल्यामुळे प्रतेक गावातील शेतकरी बांधव हे गहू ,हरभरा, व ज्वारी पिकांसह इतर विकांची पेरणी ची लगबग चालु आहे. त्यामुळे शेतीवर येणाऱ्या अवकाळी सारख्या किंवा इतर नैसर्गिक संकटात येणाऱ्या अडचणी त्यावर मात करण्यासाठी शेतकरी यांना आर्थिक आधार म्हणून पिक विमा योजना ही फार महत्वाची आहे. पिक विमा योजना ही फार महत्वाची आहे, पिक विमा भरण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर - 2025 असून त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेत जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी व एग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी चे तालुका प्रतिनिधी श्री, एकनाथ घांगळे यांनी गाव पाड्यावर जाऊन शेतकऱ्यांनी जास्तीत - जास्त या योजनेत सहभागी व्हावे यासाठी शेतकऱ्यांना आव्हान केले आहे. त्यामुळे उपस्थित श्री गणेश गावीत साहेब,(ग्रा पं अधिकारी बुबळी) श्री,पवार मॅडम , ( सहाय्यक कृषी अधिकारी सुरगाणा ) श्री एकनाथ घांगळे , पिक विमा विभाग सुरगाणा तालुका कर्मचारी तसेच बुबळी ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते
What's Your Reaction?








