शिंदे समितीच्या अहवालावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, राज्य सरकारला दिला इशारा !!
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अहवालावर प्रतिक्रिया दिली. या समितीचा अहवाल सकारात्मक नसला तर आपण राज्य सरकारच्या विरोधात भूमिका मांडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तसेच समितीच्या अहवालात काय-काय असले पाहिजे? याबाबत मनोज जरांगे यांनी भाष्य केलं. “निवृत्त न्यामूर्ती संदीप शिंदे समितीने जो अहवाल सादर केला आहे तो सरकारने काही ओपन केलेला नाही. त्यामुळे त्या अहवालामध्ये काय आहे हे आपण सांगू शकत नाही. शिंदे समिती ही नोंदी तपासण्यासाठी आहे. मराठा समाज कुणबी कसा आहे, मराठा कुणबी एकच आहे, हैदराबाद गॅजेटमध्ये राज्यातील मराठा समाजाबद्दलचे असणारे अनेक पुरावे आहेत, राज्यातील जनगणना 1884 च्या अगोदरचे गॅजेट या सर्वांचा सर्वच विषयांचा हा अहवाल असण्याची शक्यता आहे. 83 व्या क्रमांकावर मराठा आणि कुणबी एकच आहे. यावर शिंदे समितीने काम केलेलं असेल तरच त्या समितीचा उपयोग आहे”, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.
What's Your Reaction?








