‘मोदी तो गयो’, संजय राऊतांचे हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वीच फटाके; भाजपवर केली अशी सडकून टीका !!

Oct 6, 2024 - 06:36
 0  37
‘मोदी तो गयो’, संजय राऊतांचे हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वीच फटाके; भाजपवर केली अशी सडकून टीका !!

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर येथील विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वी एक्झिट पोलने सत्तेच्या समीकरणाची गणितं मांडली आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी या निकालापूर्वीच मोदी तो गयो, असा चिमटा काढला आहे. या निवडणुकीच्या निकालापूर्वीच राऊत यांनी जोरदार शा‍ब्दिक फटाके फोडले. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर तोंडसूख घेतले होते. त्यांनी महाविकास आघाडीमुळे अनेक प्रकल्प खोळंबल्याचा आरोप केला होता. तर काँग्रेसचे पदाधिकारी ड्रग्ज रॅकेटमध्ये आढळल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राऊतांनी असा जोरदार प्रहार केला.नाशिकमधील मेळाव्यात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे येथील सभेत उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. त्यांच्यामुळे प्रकल्प रखडले. मेट्रो, बुलेट ट्रेन रखडल्याचा आरोप केला. पंतप्रधानांनी या सर्व प्रकल्पाचा खर्च वाढल्याचा आरोप केला होता. त्यावर राऊतांनी पलटवार केला. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळी शिंदे हे चार वर्षांचे असतील आणि ते गोधडीत… अशा खालच्या भाषेत त्यांनी टीका केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow