मुंबईत घरं महागणार; राज्यातील रेडी रेकनर दरांमध्ये सरकारकडून वाढ !!
मुंबई : मुंबईत ३.३९ टक्के, ठाण्यात ७.७२ टक्के आणि सोलापुरात सर्वाधिक १०.१७ टक्के वाढ करण्यात आली आहे. राज्यात सरासरी ४.३९ टक्के रेडी रेकनर दरांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात घरांच्या किंमती वाढणार आहेत. नवे दर आज मंगळवारपासून लागू होतील. त्यामुळे घरे महागणार आहेत. राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक विभागाने २०२५-२६ कालावधीसाठी रेडीरेकनर दरांमध्ये वाढ जाहीर केली आहे.
What's Your Reaction?








