कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा येथे
कुऱ्हा : कला व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा (ता. तिवसा, जि. अमरावती) येथे ६ डिसेंबर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अजय अभ्यंकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्याबद्दल आणि भारतीय संविधाननिर्मितीतील त्यांच्या बहुमोल योगदानाबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर मराठी विभागाच्या विभागप्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.निशा जोशी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानावर,विचारसरणीवर आणि आधुनिक भारताच्या निर्मितीत त्यांच्या विचारांचे महत्व यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन प्रा. डॉ.किर्ती गांधी मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. हर्षा कांबे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विविध विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.डॉ.उमेश राठी,भूगोल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. किशोर ताकसांडे,प्रा.मेश्राम तसेच इतर अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.महाविद्यालयात सामाजिक मूल्यांची जपणूक,संविधानिक विचारांची जोपासना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला,व या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदना व वंदे मातरम् या गीताने झाली.
What's Your Reaction?








