पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय !!

Dec 8, 2024 - 12:21
 0  35
पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय !!

ऑस्ट्रेलिया गुलाबी चेंडूच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने आपल्या विजयाचा रेकॉर्ड कायम ठेवत भारतावर मोठा विजय नोंदवला आहे. दुसऱ्या डावात भारताने १७५ धावा करत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १९ धावांचे लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेड कसोटीत भारतावर १० विकेट्सने विजय मिळवला आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. दुसऱ्या डावात भारताची फलंदाजी फळी पूर्णपणे फेल ठरली. भारताचे सर्व फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात आणि भागीदारी रचण्यात अपयशी ठरले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे फलंदाज दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करू शकली नाहीत. भारतीय संघाने निःसंशयपणे १२८ धावा केल्या आहेत, परंतु यादरम्यान त्यांनी ५ मोठ्या विकेट गमावल्या. दुसऱ्या डावात टीम इंडियाची टॉप ऑर्डकर सपशेल फेल ठरली. यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली आणि शुबमन गिल पुन्हा एकदा फ्लॉप ठरले. तर रोहित शर्मानेही सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना निराश केले. ऋषभ पंत आणि नितीश रेड्डीने पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला पण भागीदारी रचू शकले नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow