ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोट तालुका अध्यक्षपदी नरेंद्र कोंडे सचिव पदी देवानंद आग्रे तर कार्याध्यक्षपदी अरुण काकड यांची निवड

प्रतिनिधी /अकोट अकोट - ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक २१ फेब्रुवारी ला अकोट येथील ठाकुरवाडी लोहारी रोड येथे संपन्न झाली. अकोट येथे ग्रामीण पत्रकार संघाची महत्त्व पुर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.यामध्ये मागील कार्यक्रमाचा आढावा घेण्यात येऊन, नुतन कार्यकारिणी गठित करण्यावर सवीस्तर चर्चा झाली.व युवा पत्रकार नरेंद्र जगन्नाथजी कोंडे यांची अकोट तालुकाध्यक्ष म्हणुन सर्वानुमते निवड करण्यात आली,तर कार्याध्यक्षपदी अरुण काकड व सचीव पदी देवांनंद आग्रे यांचीही अविरोध निवड करण्यात आली.खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडप्रक्रिया पार पडली.यावेळी पत्रकार संघातील पदाधिकाऱ्यांचे कुटुंबातील सदस्यांची विवीध संस्थेवर निवड झाल्याबद्दल त्यांच्याही सत्कार करण्यात आला.त्यामध्ये प्रामुख्याने संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड नरेंद्र बेलसरे अकोला बार असोसिएशनचे उपाध्यक्ष पदी विजयी झाल्याबद्दल,सौ.स्वाती वैभव गुजरकर यांची सावरा ग्रा.प.सरपंचपदी,तर सौ.रुपाली देवानंद आग्रे,यांची ग्रा.पं.रोहणखेड उपसरपंच पदी,निलेश झाडे यांची ग्रा.पं. अकोलखेड च्या उपसरपंच पदी व सौ.सुनिता अरुण काकड,माजी सरपंच,पुंडा यांची पुनश्च ग्रा.पं.पुंडा सदस्यपदी तर साधुबुवा खोटरे यांची से.स.सो.रौदंळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सुरवातीला उपस्थीत मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या आढावा बैठकीला पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष गजानन वाघमारे,राज्यसचिव राजेश डांगटे,सहसचिव अविनाश राठोड,राज्य प्रवक्ते अनंत गावंडे,हे प्रमुख पाहुणे होते.तर विशेष उपस्थितीत शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड गजानन पुंडकर,जेसीआय चे अकोट तालुकाध्यक्ष अजय अडोकार, सामाजिक कार्यकर्ते जयंत खोटरे,विलास नवले होते. तर प्रमुख उपस्थितीत पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष,डॉ.गोपाल नारे, अमरावती विभागीय उपाध्यक्ष अहेमद शेख,जिल्हाध्यक्ष अॅड.नरेंन्द्र बेलसरे,जिल्हा सचिव डॉ.संतोष ताकोते,जिल्हा उपाध्यक्ष मनोहर गोलाईत,कमलेश राठी, निरंजन गावंडे,जिल्हा सदस्य प्रकाश आमले, विठ्ठल येवोकार, यांची होते. सर्व उपस्थिती मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड गजानन पुंडकर व जेसीआय चे अकोट तालुका अध्यक्ष अजय अडोकार यांचा संघटनेच्या वतीने सहृदय सत्कार करण्यात आला.तसेच अॅड नरेंद्र बेलसरे अकोला बार असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून विजयी झाल्याबद्दल अरुण काकड यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष विणके प्रस्ताविक राजेश डांगटे,तर आभार प्रदर्शन विठ्ठल गुजरकर यांनी केले,सर्व उपस्थिती मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करत सघटना मजबुत करुन संघटन वाढवा.सामाजीक कार्यक्रम राबवा.असे मोलाचे मार्गदर्शन केले.या बैठकीला जेष्ठ पत्रकार विठ्ठल गुजरकर,गोवर्धन चव्हाण, साधुबुवा खोटरे,अरुण काकड, काशिनाथ कोंडे, तुषार अढाऊ,राजेश साविकार,पवन बेलसरे,गणपत केदार, गजानन राठोड, सुनिल तायडे, विनोद सगणे, निलेश झाडे,राहुल पाचडे, अश्विन पागृत,शरद भेंडे, दत्ता भगत,शरद वालसिंगे,धन्नु बायवार,वैभव गुजरकर, अभिजीत सोळंके, तुषार सावरकर अतुल डाफे,अमोल मोहड,पप्पु वनकर,अनिल मालवे सह सौ.सुनिता काकड,सौ.शिल्पा राठी,सौ.रश्मी अडोकार सौ.स्वाती गुजरकर, सौ.रुपाली आग्रे ई.उपस्थीती होती.

Feb 22, 2024 - 17:59
 0  180
ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोट तालुका अध्यक्षपदी नरेंद्र कोंडे सचिव पदी देवानंद आग्रे तर कार्याध्यक्षपदी अरुण काकड यांची निवड

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow