अमेरिकेतील लॉस एंजिलिसमध्ये भीषण अग्नितांडव ....महाप्रचंड नुकसान !!
अमेरिकेतील राज्य कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजिलिसमध्ये अग्नितांडव सुरु आहे. या अग्नितांडवाने सुपरपॉवर अमेरिकेला अक्षरक्ष: हादरवून सोडलय. महाप्रचंड नुकसान झालय. रस्त्यावर रात्र काढण्यासाठी लोक मजबूर झाले आहेत. हजारो घरं आगीत जळून खाक झाली आहेत. लोकांना रस्त्यावर व मदत शिबीरांचा आधारा घ्यावा लागतोय. या आगीमुळे आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या चार दिवसांपासून लागलेली ही आग 40 हजार एकरमध्ये पसरली आहे. यात 29 हजार एकरचा परिसर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. कॅलिफोर्नियाच्या जंगलापासून ते घरापर्यंत बरच काही या आगीत जळून खाक झालय. पाण्याची फवारणी हाच या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा एकमेव मार्ग निवडण्यात आला आहे. कॅलिफोर्नियातील अनेक बँका या आगीत जळून खाक झाल्या आहेत.
हॉलिवूड हिल्समध्ये राहणाऱ्या अनेक हॉलिवूड कलाकारांना नाईलाजाने आपलं घर सोडावं लागलं आहे. त्याशिवाय अनेक कलाकारांची कोट्यवधींची घर जळून खाक झाली आहेत. सेंटा एना हवेचा वेग जितका वाढतोय, तितकीच दिशा सुद्धा बदलतेय. लॉस एंजेलिसचा सनसेट बुलेवार्डला आगीच्या ज्वाळांनी घेरलय. आगीने इतकं विक्राळ रुप धारण करण्याला हवा कारणीभूत आहे.
किती अब्ज डॉलर्सच नुकसान ?
या आगीमध्ये अमेरिकेच मोठ नुकसान झालय. वीमा कंपन्यांच सुद्धा नुकसान झालय. कारण या क्षेत्रातील घरांची किंमत 60 लाख डॉलर ते 21 कोटी डॉलरपर्यंत आहे. माहितीनुसार, आतापर्यंत विमा कंपन्यांचं 20 अब्ज डॉलर्सच नुकसान झालय. हे नुकसान 200 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
What's Your Reaction?








