दस्तूर नगर प्रभागात भाजपाला जोरदार झटका!!
दैनिक जागर मराठी
अमरावती : अमरावती महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक, महासचिव आ. संजय खोडके यांच्या नेतृत्वावर व कुशल कार्यशैलीवर विश्वास दर्शवून अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होत आहे. अशातच प्रभाग क्रमांक १० बेनोडा -दस्तूर नगर प्रभागातील भाजपचे कार्यकर्ता मनीष उर्फ छोटूभाऊ पाटील व त्यांच्या पत्नी अर्चना मनीष पाटील यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी पक्षाचे संघटक महासचिव आ. संजय खोडके यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा दुपट्टा देऊन स्वागत करीत पक्ष प्रवेश केला. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही या घोषवाक्याला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात प्रगत, उन्नत व समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वसमाजवेशक जनतेची पक्षाला मोठी साथ लाभत असून राष्ट्रवादीच्या विचारधारेला अनुसरून प्रत्येक समाज घटक हा एकवटला जात आहे. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी मोठ्या जोमाने व ताकदीनिशी उतरली असून सर्वांची मोठी साथ, विश्वास व आशीर्वाद लाभत आहे. या शृंखलेत यशोदा नगर भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले आहे. त्याचवेळी अर्चना मनीष उर्फ छोटू पाटील यांना प्रभाग क्रमांक १० बेनोडा -दस्तूर नगर मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली. अमरावती महानगर पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक -१० बेनोडा -दस्तूर नगर मधून अमरावती महानगरपालिका स्थायी समिती माजी सभापती अविनाश मार्डीकर व माजी नगरसेवक मंगेश मनोहर यांची उमेदवारी जाहीर झाल्या नंतर आता अर्चना मनीष पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मोठी ताकद वाढली आहे. यावेळी मार्गदर्शन करतांना आ. संजय खोडके यांनी सांगितले कि, समाजविकास व मानवविकास करीत असतांना त्याला राजकारणाची जोड हि महत्वाची आहे. समाजासाठी चांगले काम करण्याची भावना बाळगणाऱ्या व्यक्तींना पक्षात स्थान देऊन संधी दिली जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठी ताकद मिळत असून हे येणाऱ्या परिवर्तनाचे द्योतक आहे. असे सांगून आ. संजय खोडके यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. यावेळी अर्चना मनीष उर्फ छोटू पाटील यांनी पक्षाने दिलेली संधी व दर्शविलेला विश्वास आपण सार्थ ठरविणार असल्याचे सांगून आभार व्यक्त केले. यावेळी यश खोडके यांच्या समवेत अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष प्रशांत डवरे, माजी महापौर ऍड. किशोर शेळके, मनपा स्थायी समिती माजी सभापती अविनाश मार्डीकर, माजी नगरसेवक मंगेश मनोहरे, राष्ट्रवादी काँग्रेस बडनेरा व्हीजेएनटी सेल अध्यक्ष भास्कर ढेवले तसेच सतीश राऊत, ज्ञानेश्वर जिचकार, उत्तमराव राऊत, दीपक इंगोले, साहेबराव सरीसे, अमोल माहुलकर ,अतुल ईटनकर, विनायक लांजेवार, निमंत गडलिंग, प्रकाश खडसे, प्रशांत देवघरे, विनोद पाटील, वसंतराव राऊत, किशोर बुटले, राजेश पाटील, दादा कुटाफळे, प्रवीण निमगावकर, अक्षय देशमुख, भावेश बुटले, राष्ट्रवादी काँग्रेसचे बेनोडा प्रभाग अध्यक्ष मंगेश तायडे, रायुकॉचे शहर सचिव अक्षय चव्हाण, प्रवीण आकोडे, जावेदभाई, साधना पोहेकर, प्रमिला कोंडे, उज्वला खरडे, सुचित्रा पाटील, सरिता नेताम, शालिनी पाटील, धनश्री ईटनकर, पुष्पा राऊतकर, मंगला यादव, सुरेखा ठाकरे, सोनल पाटील, अनिता राऊत, सरिता यादव, कल्पना पोहेकर, ज्योती बुटले, छाया अकोलकर, नारायणी थोरात, तृप्ती सपकाळ, सीमा खडसे, श्रद्धा मामनकर, योगीराज तायडे, प्रसन्न तायडे, यश चौधरी, यश पाटील, अथर्व बेंदरे, तन्मय जाधव, उत्कर्ष मुधोळकर, राज मुधोळकर, अनिकेत पाचखंडे, अक्षय शिंदे, कमलेश पिठेकर , प्रेम नाईक, रोशन शेख, रोहित चतुर्वेदी, यश ओगले, कार्तिक राऊत, अक्षय किटके, यश सवयकर , मोहित वासनिक, मनीष राऊत, प्रकाश यादव, रोहित चव्हाण, राहुल यादव, रुद्रेश सालोडे, प्रतीक भैसे, अक्षय गावंडे, शुभम चौरे, अनुज मोरे, अजय निगम, सुमित नाईक, शुभम शेंद्रे आदींसह यशोदा नगर भागातील नागरिक तसेच प्रभाग क्रमांक १० बेनोडा -दस्तूर नगर भागातील कार्यकर्ते आदिसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व फ्रंटचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. असे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती शहर प्रसिद्धी प्रमुख अमित तायडे यांनी कळविले आहे.
What's Your Reaction?








