अकोट भाजप मध्ये होणार असंतोषाचा स्फोट ...शेकडो कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत !!

Oct 28, 2024 - 04:25
 0  56
अकोट भाजप मध्ये होणार असंतोषाचा स्फोट ...शेकडो कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत !!

अकोट: - भाजपने निष्ठावंत, प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून व त्यांच्या भावनांचा अनादर करून उमेदवारी दिल्याने शेकडो कार्यकर्त्ये पक्ष सोडण्याच्या तयारी आहेत.यामध्ये जिल्हा भाजपा युवती च्या पदाधिकारी राहिलेल्या महिला नेत्याचा पुढाकार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना भाजपने यावेळी भाजप वाढीसाठी ज्यांनी निष्ठेने प्रामाणिकपणे आजपर्यंत कार्य केले त्या कार्यकर्त्यांचा सन्मान करून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी अकोट मतदार संघातील सर्व भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. आणि याबाबत भाजपने सकारात्मक संकेतही दिले होते. मात्र शेवटच्या क्षणी प्रकाश भारसाकळे यांनाच उमेदवारी दिली. भारसाकळे चार दोन भाजपचे कार्यकर्ते यांनाच महत्व देतात व इतरांना भेटही देत नाहीत वा साधे दोन शब्दही त्यांच्याशी बोलत नाही.त्यांचेकडे काम घेऊन गेलो तर आधी चार लोकांची परवानगी घ्यावी लागते. नंतरच त्यांच्यापर्यंत पोहोचता येते अशी दुरावस्था भाजपच्या निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांची झाली आहे. याकडे पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष तर केलेच व कार्यकर्त्यांचा अनादरही  केला. अशी भावना आता मतदारसंघात  जोर धरत असून त्या मुळे असंतोषचा उद्रेक होण्याचे चिन्ह दिसत आहेत. भाजप वाढीसाठी चंचल तेने काम करुन हजारो महिलांना भाजपाशी जोडणाऱ्या अकोटातीत प्रामाणिक महिला पदाधिकारी शेकडो कार्यकर्त्यासह पक्ष त्याग करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती लागले आहे पक्ष या पितांबरी असंतोषला कसे शमविते यावरच भारसाकळे यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे हे मात्र खरे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow