स्वतंत्र दिवस व गणतंत्र दिवसाचा उत्सव सर्वतोपरी " - कॅप्टन सुनिल डोबाळे !!

Aug 15, 2024 - 17:23
 0  185
स्वतंत्र दिवस व गणतंत्र दिवसाचा उत्सव सर्वतोपरी " - कॅप्टन सुनिल डोबाळे !!
स्वतंत्र दिवस व गणतंत्र दिवसाचा उत्सव सर्वतोपरी " - कॅप्टन सुनिल डोबाळे !!

अकोट,

प्रतिनिधी, धीरज डोबाळे 

  आजादीका उत्सव स्वातंत्र्य दिन आरंभ ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य द्वारा भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यात आला.यानिमित्य स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे भव्य जागरण बाईक रॅली काढण्यात आली.रॅलीत महिला पुरूष युवक युवती यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.या रॅलीला आरंभ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष कॅप्टन सुनील डोबाळे यांनी आरंभ संपर्क कार्यालय येथून हिरवा झेंडा दाखवला.सकाळी ६ वाजता शहरातील विवीध मार्गावरुन जागरण रॅली देशभक्तीचे गीत वाजवून जवळपास संपूर्ण शहर देशप्रेम या भावनेत वाहून गेले.बाईक रॅलीची सुरुवात आरंभ संपर्क कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती पोपटखेड रोड येथून रॕलीस सुरुवात होवून छत्रपती शिवाजी महाराज चौक जवाहर रोड मोठे बारगण शिवाजी नगर खतिबपुरा सोमवार वेस श्री.शिवाजी कॉलेज दर्यापूर रोड राजमंगल कार्यालय जृवळु उज्वल नगर सरस्वती नगर संभाजी नगर कॉलेज रोड शनिवार पुरा कालंका चौक यात्रा चौक गवळी पुरा कृषी विद्यालय मार्गे अकोला नाका पुरी साथ अकोट बस डेपो जिजामाता चौक हिवरखेड रोड ए पी जे अब्दुल कलाम चौक (कलदार चौक) येथुन आरंभ कार्यालय येथे रॕलीचा समारोप करण्यात आला.ध्वजारोहन व राष्ट्रगीताने रॕलीची सांगता झाली.

       रॅली मध्ये सर्वात समोर देशभक्ती गीतांचे वाहन नंतर महिला आपआपल्या बाईकवर नटून थाटून सवार होत्या तर त्यामागोमाग पुरुष बाईक स्वार व सर्वात शेवटी स्वतः कॅप्टन सुनिल डोबाळे हे होते . 

   आरंभ ऑर्गनायझेशनच्या देशभक्तीपर उपक्रमा मुळे सर्वच स्तरावरून आरंभ ऑर्गनायझेशनचे शहरवासियांनी कौतूक केले व देशप्रेमाची भावना निश्चितच सदैवं तेवत राहील अशी ग्वाही यावेळी कॅप्टन सुनील डोबाळे यांनी दिली.रॅलीचे यशस्वीते करीता आरंभ चे पदाधिकारी व ताजनापुरवासियांनी परीश्रम घेतले. 

सर्व सहभागी झालेल्या मंडळींना सन्मानपत्र ही आरंभ तर्फे देण्यात येईल.असे कॅप्टन सुनिल डोबाळे यांनी आपल्या समारोपीय भाषनांत जाहीर केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow