सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जीवंत राहायचंय? शिंदे गटाचा संतप्त सवाल; नेमकं प्रकरण काय?
लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे देशभरातील विविध पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. युत्या आणि आघाड्यांमध्ये जागावाटपासाठी बैठका चालू आहेत. महाराष्ट्रात महायुतीत भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि इतर लहान पक्ष आहेत. या पक्षांमध्ये सध्या वाटाघाटी चालू आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर काहीच महिन्यात विधानसभा निवडणूकही होणार आहे. त्यामुळे विधानसभेबाबतही विचार चालू आहे. अशातच काही जागांवरून महायुतीत तणाव निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत.
शिवसेना पक्ष फुटून दोन गट पडले आहेत. त्यापैकी एक गट महायुतीत आहे. संयुक्त शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ४० आमदार शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. तर १५ आमदार शिवसेनेच्या ठाकरे गटात आहेत. तसेच संयुक्त शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १३ खासदार शिंदे गटात, तर ५ खासदार ठाकरे गटात आहेत. अशातच जे आमदार आणि खासदार ठाकरे गटात आहेत त्यांच्या जागा आपल्याला मिळाव्या यासाठी भाजपाकडून प्रयत्न चालू असल्याची चर्चा आहे. भाजपाला शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या काही जागा हव्या आहेत. त्यासाठी महायुतीत वाटाघाटी चालू असल्याचं बोललं जात आहे. परंतु, यावर शिवसेनेच्या शिंदे गटाने तीव्र संताप व्यक्त केला आहे
What's Your Reaction?








