संत शिरोमणी श्री.संताजी जगनाडे महाराज यांची जयंती  निःशुल्क रोगनिदान शिबिराचे आयोजन करून साजरी!!

Dec 10, 2025 - 16:16
 0  9
संत शिरोमणी श्री.संताजी जगनाडे महाराज यांची जयंती  निःशुल्क रोगनिदान शिबिराचे आयोजन करून साजरी!!

दैनिक जागर मराठी


नेरपिंगळाई :  जय संताजी बहुउद्देशीय तैलिक समिती, नेरपिंगळाई र.न.५७९/१८,श्री.संत गुलाबपुरी महाराज संस्थान,नेरपिंगळाई व पी. आर.पोटे आयुर्वेदिक रुग्णालय,अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार,दिनांक:-८ डिसेंबर रोजी संत शिरोमणी श्री.संताजी जगनाडे महाराज यांची जयंती  निःशुल्क सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन  करून करण्यात आली.श्री.संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माया सुभाष मालगे यांच्या स्वरचित आरतीचे गायन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.त्यानंतर मागील वर्षी ज्या बांधव व भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या पावनस्मृतीचे स्मरण करून मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रसंगी समाज भूषण शुभम विजय कपिले(पोलीस उपनिरीक्षक),अभिजित राजेंद्र खोडे(सी.आर.पी.एफ.),वेदांत दिलीप डीवरे (अग्निवीर) म्हणून नियुक्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.समाजाची एकता व संघटन पाहून कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कृषी अधिकारी रामकृष्णजी राऊतयांनी समाधान व्यक्त केले.समाजातील मुलांनी उच्चशिक्षित होऊन समाजाची व देशाची सेवा करावी असे मत कार्यक्रमाचे उदघाटक उदयभाऊ तायडेयांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक राजीवजी अजमीरे उपस्थित होते.प्रसंगी मयुरी ट्रेडर्स,मोर्शी कडून नवीन वर्षाचे कॅलेंडर व हनुमान चालीसा सर्व समाजबांधवास वितरित करण्यात आले.समाजाने एकजुटीने काम केल्यास आपल्या समाजाची निश्चित प्रगती होते असे मत संघटनेचे अध्यक्ष सुरज अवचार यांनी व्यक्त केले.संताजी महाराजांनी  मानव कल्याणासाठी कार्य केले असे मत महिला संघटनेच्या अध्यक्षा स्वाती बाखडे यांनी व्यक्त केले.प्रमोद घाटे यांनी संताजी महाराजांचे कार्य यावर आधारित कविता सादर केली.गौरी महाजन हिने युवतींसाठी संघटनेत शाखा स्थापन करण्यात यावी असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव विजयराव कपिले यांनी केले.संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश आंबेकर यांनी संताजी महाराज यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट केला.कार्यक्रमाचे संचालन आशिष सापधारे व आभार प्रदर्शन हर्षदा घाटे यांनी केले.आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी योग शिक्षक पराग डफ्फर,हर्षल डीवरे,मंगेश बाखडे,राहुल सावरकर तसेच संघटनेच्या तीनही शाखेच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow