नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसी मधील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क व फिनले मिल तात्काळ सुरू करा !!
अमरावती प्रतिनिधी,
अमरावती - अमरावती लोकसभेच्या माजी खा. नवनीत राणा व आमदार रवी राणा हे दिल्ली दौऱ्यावर असून आज त्यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेत नांदगाव पेठ येथील पंचतारांकित एआयडीसी येथे मंजूर करण्यात आलेल्या पीएम मित्रा टेक्सटाइल पार्कच्या निर्मितीच्या कामाला गती द्यावी व अचलपूर येथील फिनले मिल तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. या प्रकल्पामुळे विदर्भातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळेल व पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क मुळे 2 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील. त्यामुळे विशेष बाब म्हणून केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या माध्यमातून केंद्र सरकारने आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा व फिनले मिल लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी आमदार रवी राणा व माजी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी यावेळी केली.
What's Your Reaction?








