श्री हव्याप्र मंडळाचे २३ जिम्नॅस्टिकपटूंची राज्यस्तरीय आर्टीस्टीक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये निवड!!
दैनिक जागर मराठी
अमरावती : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती जिल्हा हाैशी जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडू तालुका क्रिडा संकुल कोपरी, ठाणे येथे आयोजित दुसऱ्या लेव्हल वाहिज राज्यस्तरीय आर्टीस्टीक जिम्नॅस्टिक्स स्पर्धा मध्ये सहभागी होणार आहे.यामध्ये आर्टीस्टीक जिम्नॅस्टिक्स एन- ४ इन एज मुलीच्या वयोगटात- मनवा हटेकर, अवंतिका पेठे, अनवी पत्रे, शरण्या खंडाळकर, तनिष्का राऊत, इरा झंजाड, एन - ५ इन एज मुलीच्या वयोगटात - सानवी गुल्हाने, श्रीया फुणे, ईछा बोपचे प्रियांशा हटकर, एन- ५ ओपन एज मुलीच्या वयोगटात वलभी हिंडोचा, मनश्री जकोटीया एन- ४ इन एज मुलाच्या वयोगटात विजय कोपुलकर, एन- ५ इन एज मुलाच्या वयोगटात श्रवण कुऱ्हेकर, अनासाने, मित गुप्ता, सय्यद हुझेन, क्रिष्णा राऊत, एन- ६ इन एज मुलाच्या वयोगटात कृशल राऊत, ज्ञानेश्र्वर काळे, एन- ६ ओपन एज मुलाच्या वयोगटात आरूष वडतकर, युवराज गोहर, रूद्र खेडकर, आदी सर्व खेळाडू सहभागी होणार आहे. संघासोबत प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून जिम्नॅस्टिक्स विभाग प्रमुख प्रा. आशिष हटेकर एन आय एस प्रशिक्षक सचिन कोठारे, स्नेहल कन्हेकर यांचा सहभाग राहणार आहे. पंच अधिकारी म्हणून वरिष्ठ खेळाडू सोहम चोपकर याची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये यशस्वी होण्याकरिता सर्व खेळाडूंना श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत यशस्वी हाेण्याचा आशीर्वाद दिला. मंडळाच्या सचिव व अमरावती जिल्हा हाैशी जिम्नॅस्टिक संघटनेच्या सचिव व महाराष्ट हाैशी जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या उपाध्यक्ष प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, अमरावती जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष प्रा रविंद्र खांडेकर, उपाध्यक्ष डॉ.विकास काेळेश्वर, काेषाध्यक्ष प्रा. राजेश पांडे, मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, मंडळाचे कोषाध्यक्ष व डी.सी पी.ई.प्राचार्य डाॅ. एस. पी. देशपांडे, मंडळाच्या कार्यकारणी सदस्य प्रा. दीपाताई कान्हेगावकर, विभागीय उपसंचालक व जिल्हा क्रीडाअधिकारी गणेश जाधव जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक प्रा. अक्षय अवघाते प्रा.डॉ. निलेश जोशी, हेमा राजवैद्य, सुखदा हंबर्डे, जिम्नॅस्टिक्स संघटनेचे पदाधिकारी, कमलाकर शहाणे, अनंत निंबोळे, प्रा. डॉ.कविता वाटाणे, विकास पाध्ये, मधुकर कांबे, प्रा. विलास दलाल, राजेश महात्मे, प्रा.नंदकिशोर चव्हाण रवी दलाल प्रा. डॉ.ललीत शर्मा व सर्व पालक यांच्या वतीने स्पर्धकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
What's Your Reaction?








