महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी व दिव्यांग बेरोजगार संघटना अकोला चे वतीने महा परीनिर्वाण दिन साजरा!!

Dec 10, 2025 - 12:38
 0  8
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी व दिव्यांग बेरोजगार संघटना अकोला चे वतीने महा परीनिर्वाण दिन साजरा!!

दैनिक जागर मराठी 

मुर्तिजापूर : दिनांक ६ डिसेंबर २०२५ ला म रा अपंग कर्मचारी संघटना , दिव्यांग बेरोजगार संघटना व दिव्यांग बहुउद्देशिय संस्था हातगांव चे वतीने मुर्तिजापूर येथे संत गाडगे बाबा चौक अकोला नाका येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महा परीनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यावेळी अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक श्रीकृष्ण बोळे सर तर प्रमुख अतिथी समाज सेवक प्रा एल डी सरोदे सर , नेहरु युवा केंद्राचे तालूकाअध्यक्ष अनिल डाहेलकर , सेवानिवृत्त दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष दिलीप सरदार व दिव्यांग बेरोजगार संघटनेचे सुधिर कडू होते . यावेळी बाबासाहेबांसारखा द्रष्टा महामानव हे या देशाचे भाग्य असून विविधता असणाऱ्या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी बाबासाहेबानी संविधान निर्मिती करून देशावर उपकार केले आहेत असे मत अध्यक्ष पदावरून श्रीकृष्ण बोळे यांनी व्यक्त केले . तर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे प्रतीक असून जगातील अनेक विषयावरील अभ्यास व त्यावरील ग्रंथसंपदा जगाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक आहे समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधूता या मूल्यावर आधारीत महान असलेले संविधान हे भारत देशासाठी आदर्श ग्रंथ असून त्याचे वाचन सर्वांनी करणे व त्यानुसार वागणे हि प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रा एल डी सरोदे यांनी आपल्या भाषणात सांगीतले .यावेळी दिलीप सरदार अनिल डाहेलकर यांनी आपल्या वक्तव्यातून बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभिवादन केले .
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप सरदार प्रास्ताविक अनिल डाहेलकर तर आभार सुधिर कडू यांनी मानले . कार्यक्रमा करीता नंदकिशोर महल्ले विजय गावंडे ' प्रज्ञाताई वरघट , शेंडे ताई , अनूप शर्मा ज्ञानेश्वर पारवे आदीसह अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते .

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow