येत्या दोन ते तीन वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होण्याची शक्यता ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली .

Dec 26, 2024 - 19:03
 0  14
येत्या दोन ते तीन वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होण्याची शक्यता ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी  व्यक्त केली .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार आहे. मागील सरकारमध्येही त्यांच्याकडे हे मंत्रालय होतं. नागपुरात बोलताना त्यांनी ऊर्जा क्षेत्र अत्यंत महत्त्वाचं असून आम्ही पुढील २५ वर्षांची ब्लू प्रिंट तयार केली, असल्याची माहिती त्यांनी दिली.विविध सरकारी योजनांतर्गत गरिबांना दिल्या जाणाऱ्या घरांसाठी वीज बिल येऊ नये, अशी आमची योजना असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याशिवाय सिंचन क्षेत्राशी संबंधित प्रलंबित प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यावरही आपला भर असल्याचं ते म्हणाले.भाजपचा कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री होणार, हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ठरवतील, असं फडणवीस म्हणाले. त्यांनी मला ज्या जिल्ह्यात लक्ष द्यायला सांगितलं असेल, त्या ठिकाणी मी काम करेन, पण मला गडचिरोली जिल्ह्यात काम करायचं आहे. हा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा आहे. गेल्या काही वर्षांत तेथील परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. महाराष्ट्रातील नक्षलवाद आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर असल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow